Megha Ghadge: अहो पाव्हनं.. तुम्ही दमान घ्या ना हो पाव्हनं.. मेघा घाडगेच्या लावणीनं पब्लिक खुळं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi 4 fame Megha Ghadge new lavani Aho Pavhan released

Megha Ghadge: अहो पाव्हनं.. तुम्ही दमान घ्या ना हो पाव्हनं.. मेघा घाडगेच्या लावणीनं पब्लिक खुळं..

Megha Ghadge: आपल्या नृत्याने महाराष्ट्राची लावणीसाम्राज्ञी हा किताब मिळवलेली अभिनेत्री मेघा घाडगे हे नाव सध्या बरेच चर्चेत आहे. त्याचे कारण आहे, 'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व. मेघाने या घरात एंट्री घेतली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. अशातच मेघाची नवी लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आही. अहो पाव्हनं.. म्हणत तिने चाहत्यांना वेड लावलं आहे.

(bigg boss marathi 4 fame Megha Ghadge new lavani Aho Pavhan released)

हेही वाचा: Urfi Javed: उर्फी डिप्रेशन मध्ये? आज ना उद्या मरणारच.. म्हणत आत्महत्येवरून केलं खळबळजनक ट्विट..

मेघा घाडगे आणि लावणी एक अतूट समिरकरण आहे. मेघाने महाराष्ट्राची लावणी सातासमुद्रापार नेली. पारंपरिक लावणीला नव्या शैलीत बांधून एक सकस आणि दर्जेदार लावणी ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. ती कायमच लावणीविषयी पोटतिडकीने बोलते. आता लावणी कशी असते याचा उत्तम नमूनाच तिने दाखवून दिला आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant: मै शादीशुदा हू.. म्हणत राखी सावंतचा नवा ड्रामा.. म्हणाली, माझ्यापासून जरा..

सप्तसूर म्युझिकने एक अनोखा लावणीचा तडका चाहत्यांसाठी आणला आहे. ‘अहो पाव्हनं...’ असे गाण्याचे बोल असलेली लावणी चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे या लावणीतून आपला नृत्याविष्कार दाखवत आहे. बऱ्याच काळानंतर अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या नव्या, अस्सल लावणीचा आनंद संगीतप्रेमींना घेता येणार आहे.

मेघासोबत अभिनेता संजय खापरेही या व्हिडिओमध्ये आहे. सप्तसूर म्युझिकने नेहमीच वैविध्यपूर्ण म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे. त्यात कोळीगीतांपासून लग्नगीतांपर्यंतच्या गाण्यांचा समावेश आहे. त्यात आता ‘अहो पाव्हनं ...’ या नव्या लावणीच्या म्युझिक व्हिडीओचा समावेश झाला आहे.

साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडीओची निर्मिती केली आहे. गाण्याचे लेखन योगेश पाटील यांनी, तर प्रवीण डोणे यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. मेघा घाडगे यांनी दिग्दर्शन केले असून, नृत्यदिग्दर्शक अविनाश पायाळ आहे. सुरेश देशमाने यांनी छायाचित्रण केले असून, जयेंद्र भांडे या गाण्याचे संगीत संयोजक आहेत. अंकित शिंदे आणि दिव्या घाग यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.