Bigg Boss Marathi 4: पहिल्याच चावडीत अपूर्वा, प्रसादची खरडपट्टी.. मांजरेकर भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi 4 first week chavdi weekend episod mahesh manjrekar slams apurva nemlekar prasad jawade

Bigg Boss Marathi 4: पहिल्याच चावडीत अपूर्वा, प्रसादची खरडपट्टी.. मांजरेकर भडकले

bigg boss marathi S 4 : बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन पाच दिवस झाले नाही तोवरच वाद आणि भांडणांना सुरुवात झाली आहे. शिवाय वेगवेगळे टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळे भलतीच रंगत येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात मनोरंजनाचे वारे वाहू लागले आहे. शिवाय प्रत्येकाची गुपितंही बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. पण प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. काल, ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या बिग बॉस च्या घरातल्या पहिल्याच चावडीत महेश मांजरेकर यांनी अपूर्वा आणि प्रसादची चांगलीच खरडपट्टी काढली.

ह्या आठवडयात अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात चांगलेच वाद झाले. या सगळ्या वादावर महेश मांजरेकर यांनी शनिवारी प्रकाश टाकला. केवळ ते दोघेच नाही तर सर्वच स्पर्धकांच्या चुकांवर ते बोलले. पण अपूर्वा आणि प्रसाद यांच्यावर ते चांगलेच भडकलेले दिसले. अपूर्वाचा आवाज आणि प्रसादचं वर्तन हे त्यामागचे कारण होते.

(bigg boss marathi 4 first week chavdi weekend episod mahesh manjrekar slams apurva nemlekar prasad jawade)

स्पर्धकांवर निशाणा साधताना मांजरेकर म्हणाले, 'बिग बॉसचं घर आठवडाभर वाजलं ते फक्त अपूर्वा नेमळेकरमुळे वाजलं. तू सगळ्यांना सांगते आवाज खाली आवाज खाली करा सांगते. मुळात सर्वात जास्त ओरडत तूच होतीस.' मांजरेकरांच्या या वक्तव्यानंतर प्रसाद जवादे "मुळात प्रोब्लेम हाच आहे की...", असं म्हणतो तेवढ्यात मांजरेकर "जवादे तुझी बाजू घेत नाहीये मी. मध्ये मध्ये तोंड खुपसायचं नाही", असं म्हणत त्याला झापतात.

मांजरेकरांचा पहिल्याच आठवड्यातील राग पाहुन बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कसा असणार आहे याचा अंदाज आला आहे. अपूर्वा आणि प्रसाद शिवाय मांजरेकरांनी घरात अनेकांची शाळा लावली. प्रसादला जाणीवपूर्वक कामाला लावले जाते का यावरही ते बोलले. तर जे सदस्य इतरांच्या सांगण्यावर स्वतःचे निर्णय घेत आहेत त्यांनाही चांगलेच सुनावले. यामध्ये अक्षय केळकर पहिल्या नंबरवर होता. त्यामुळे आजच्या भागात काय होणार याची उत्कंठा चांगलीच वाढली आहे.