Bigg Boss Marathi 4: त्याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे.. कुणविषयी बोलतायत किरण माने.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 groupism staring kiran mane said game is started

Bigg Boss Marathi 4: त्याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे.. कुणविषयी बोलतायत किरण माने..

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात आता खरी रंगत येऊ लागली आहे. केवळ वादच नाही तर नवनवीन टास्क आणि ट्विस्टही येत आहेत. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू झाल्या झाल्या दोनच दिवसात वाद आणि भांडणांना सुरुवात झाली. शिवाय टास्क, नाच-गाणी, गॉसिप, कॅप्टनसी टास्क यामुळ प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. गेली 9 दिवस 16 स्पर्धकांनी मिळून घरात आपापले स्थान निर्माण केले आहे. असे असले तरी अद्याप बिग बॉस मराठीच्या घरात गटबाजीचे राजकारण सुरू झालेले नाही. परंतु लवकरच त्याचीही सुरुवात होणार आहे. बिग बॉसच्या घरात लवकरच गट पडतील असे दिसते आहे.

(Bigg Boss Marathi 4 groupism staring kiran mane said game is started)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांचे गट बनणे हे अगदीच साहजिक आहे पण किती ते टिकतील हे मात्र वेळच ठरवते. असाच एक गट आता घरामध्ये बनेल असे दिसते आहे. किरण माने, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, तेजस्विनी, योगेश, विकास आणि निखिल यांच्यामध्ये आज चर्चा रंगणार आहे. ज्यामध्ये अमृता धोंगडे म्हणाली, "टीम म्हणून माझं म्हणणं आहे.. आपण टीम म्हणून खेळलो, तो आपल्या टीमचा माणूस होता त्याला विचारलं.. तो नाही आला संपला विषय..'' तर किरण माने यांचं म्हणणं आहे, "त्याला कळलं आपण उघडे पडणार म्हणून तो पळतो आहे. काल पहिली फेरी झाल्या झाल्या मी याला (विकासला ) म्हणालो, याचा गेम सुरु झाला, याला ग्रुप मध्ये घेणं म्हणजे… बावळटपणा काही अर्थच नाही तो कोणाचं ऐकूनच घेत नाही.''

त्यावर निखिल राजेशिर्के म्हणाला, आता अजून एक विचारायचं आहे, यापुढे कुठले टीम टास्क आले तर आपण एकत्र टीम म्हणून खेळायचं का?.. तर किरण माने तेजस्विनीला म्हणाले, “तू मला झिरो ठरवून देखील मी तुला सेफ केलं नॉमिनेशनमध्ये, माझ्या मनात राग नाही” आणि “अमृता मी माझी कॅप्टन्सी तुला वाचवण्यात घालवली, तो निर्णय वेगळा होता, त्यावेळेस मी तुम्हांला सिग्नल देतं होतो पण तुम्ही ऐकत नव्हता..” या चर्चा पाहून सगळेच अवाक झाले आहेत. या चर्चा वरवर सहज वाटत असल्या तरी बिग बॉस मराठीच्या घरात या चर्चा मोठं राजकारण घडवणार आहेत हे मात्र नक्की.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi