
Bigg Boss Marathi 4: 'थिएटर' चं स्पेलिंग कसं लक्षात ठेवतो सिद्धार्थ जाधव? भन्नाट आयडिया एकदा ऐकाच...
Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहेत ते वाइल्ड कार्डच्या आधारे घरात एन्ट्री केलेले चार सदस्य....एक मीरा जगन्नाथ,दुसरा विशाल निकम,तिसरा आरोह वेलणकर आणि चौथी ड्रामा क्वीन राखी सावंत. सध्या कॅप्टन्सी कार्याची धामधूम सुरू असतानाच बिग बॉसच्या घरात अभिनेता सिद्धार्थ जाधव गेलेला दिसतोय. बोललं जात आहे तो त्याच्यासोबत घराबाहेर पडताना एका सदस्याला घेऊन बाहेर प़डणार आहे. त्यामुळे अर्थातच सदस्यांच्या मनात कोण बाहेर पडणार यावरनं धाकधूक होतीच त्यामुळे त्यांच्यातलं वातावरण हलकंफुलकं करताना सिद्धार्थनं मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमात शिकल्याचा फरक सांगत स्वतःचे काही धमाल किस्से शेअर केले. (Bigg Boss Marathi 4: Siddharth Jadhav entry, Balbharti Promotion, Marathi And English Medium difference)
सिद्धार्थ जाधव सध्या चर्चेत आहे ते त्याच्या 'बालभारती' सिनेमामुळे. लेखक दिग्दर्शक नितीन नंदन यांनी एक सुरेख विषय 'बालभारती' सिनेमातून मांडला आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देत भाषेच्या अडचणीमुळे मागे न पडता ते पुढे जायला हवेत याला प्रोत्साहन देणारा विषय नंदन यांनी आपल्या सिनेमातून मांडला आहे. या सिनेमात सिद्धार्थ व्यतिरिक्त अभिजित खांडकेकर,नंदिता धुरी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सर्वच कलाकार सिनेमाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहेत. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ बिग बॉसच्या घरात गेला अन् त्यानं खूप मजामस्ती केली.
सिद्धार्थ जाधवनं बिग बॉसच्या घरात गेल्यावर आपलं इंग्रजी मराठी माध्यमात शिकल्यामुळे फारसं चांगलं नसलं तरी आपण त्याचं दडपण कधी घेतलं नाही,तर कशाप्रकारे त्या भाषेचा आनंद घेतला,तिला लक्षात ठेवलं याचे काही मजेदार किस्से सांगितले. यावेळचा व्हिडीओ वर बातमीत जोडला आहे तो नक्की पहा. या व्हिडीओत सिद्धार्थ आपण थिएटरचं इंग्रजी स्पेलिगं कसं लक्षात ठेवतो याचा एक धम्मास किस्सा शेअर केला आहे.
हेही वाचा: Swasthyam 2022 : शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योगाभ्यास