Bigg Boss Marathi 4: पिक्चर यांनी केला, क्लायमॅक्स मी दाखवतो! चावडीवर मांजरेकरांचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 third week chavdi mahesh manjrekar slams everyone

Bigg Boss Marathi 4: पिक्चर यांनी केला, क्लायमॅक्स मी दाखवतो! चावडीवर मांजरेकरांचा धुमाकूळ

Bigg Boss Marathi: सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत. घरामध्ये रोज नवीन वाद, नवा राडा होत आहे. आठवड्याभरात स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. आज बिग बॉस च्या घराची तिसरी चावडी आहे. महेश मांजरेकर या चावडीत कुणाला काय बोलणार, कुणाचे वाभाडे काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(Bigg Boss Marathi 4 third week chavdi mahesh manjrekar slams everyone)

हेही वाचा: Rhea Chakraborty: हिला कोणी बोलावलं? दिवाळी पार्टीत रियाला पाहून नेटकरी संतापले

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील हा सर्वात रंगतदार आठवडा होता. या आठवड्यात स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. मग ते 'रोख ठोक' ही कार्य असो किंवा कॅप्टनसी टास्क. स्पर्धकांनी शब्दाच्याच नाही तर ताकदीच्याही सर्व मर्यादा ओलांडल्या. कॅप्टनसी कार्यात तर मेघा आणि योगेश यांचा वाद शिगेला गेला. योगेशच्या रागाने घर दणाणून उठले. त्याने रागाच्या भरात घरातील मालमत्तेचे नुकसान केले. आता हा सर्व राडा मांजरेकर आजच्या भागात पद्धतशीरपणे बाहेर काढणार आहेत.

यासंदर्भात माहिती देणारा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये मांजरेकरांचा राग अक्षरशः अनावर झालेला आहे. मांजरेकर म्हणतात, 'हा आठवडा एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमापेक्षा कमी नव्हता. इथे अॅक्शनही झाली आणि रिअॅक्शनही मिळाली. कुणी हीरो होऊन लढलं तर कुणी विलन होऊन भिडलं. यांनी कितीही राडा घातला तरी त्यांच्या चित्रपटाचा क्लायम्ॅक्स माझ्या हातात आहे. तोच करायला भेटूया आज बिग बॉसच्या चावडीत,' हा प्रोमो सध्या बराच व्हायरल होत आहे. त्यामुळे महेश मांजरेकर नेमकं आज बोलणार ही पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत.