'मी तिलाच घाबरतो या घरात...', घरात इतक्या महिला...विकास कोणाविषयी बोलला?Bigg Boss Marathi 4 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4,Vikas Sawant speak to amruta dhongade .

Bigg Boss Marathi 4: 'मी तिलाच घाबरतो या घरात...', घरात इतक्या महिला...विकास कोणाविषयी बोलला?

Bigg Boss Marathi 4: बिग बॉसची चावडी संपताच त्यात काय घडले, मांजरेकर सर कोणाला काय बोलले ? यावर चर्चा होतेच पण आजच्या भागात दिसणारी चर्चा सर्वात इंट्रेस्टिंग असणार आहे. आज अमृता धोंगडे आणि विकास सावंत मध्ये जी चर्चा झाली ती आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये विकास अमृताला सांगताना दिसणार आहे,''मी खरं बोलू आज सर बोलले ना मला छान वाटलं. मी अपूर्वाला कधी वाईट नाही बोललो, मी तारीफच करत आलो आहे. माझं असं आहे ना एकदाच तोडून टाकायचे, मला सहन नाही होत गोष्टी अन्यथा'', आता आपल्या लक्षात आलंच असेल विकास अपूर्वा नेमळेकरविषयी बोलत आहे. (Bigg Boss Marathi 4,Vikas Sawant speak to amruta dhongade )

हेही वाचा: Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात गोल्डन बॉयची एन्ट्री, डोक्यापासून पायापर्यंत इतकं किलो सोनं घालतो अंगावर..

विकासच्या बोलण्यानंतर लगेच अमृता त्याला म्हणाली, ''तू जे कारण दिले ते मला पटले नाही''. त्यावर विकासने त्याचा मुद्दा अमृताला सांगितला. तो म्हणाला, ''ती सारखी म्हणते ना मी वैयक्तिक खेळते म्हणून मी तिला बोललो...'', आता हा दोघांमधला संवाद अपूर्वा नेमळेकरला घेऊन चालला आहे बरं का.

पुढे विकास म्हणाला, ''ते माझं वैयक्तिक होतं... मी खूप ...आणि बोलता बोलता मध्ये तो थांबला'', यावर अमृता म्हणाली, ''तू इरिटेड झाला होतास... मग तू बोलत नाही तिथे तू कमी पडतोस. तुला संधी होती तर तू बोलला का नाहीस?''. यावर विकास म्हणाला, ''मी कधी तिला बोललो की जरा चांगली बोल ना. तू एवढ्या रागाने बोलणार तर मला सहन होणार नाही ... मी तिलाच घाबरतो या घरात, बाकी कोणाला नाही घाबरत नाही..'' आणि असं बोलता बोलता विकासने चक्क आपण अपूर्वाला घाबरतो हे कबूल केले.

हेही वाचा: Akshaya-Hardeek Wedding: गोड गोजिरी..अक्षया झाली नवराई..पहा लग्नाचे खास क्षण

पुढे आणखी काय झाले हे जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.