
सईच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नकार्याआधीचे प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सोशल मिडियावर शेअर करत होती.
मुंबई- ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा पार पडला होता आणि आज अखेर सई विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटामाटात तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली आहे. सईच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. लग्नकार्याआधीचे प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सोशल मिडियावर शेअर करत होती.
हे ही वाचा: बिग बॉस १४: रुबिना दिलैकचा पती अभिनवसोबत यावर्षीच होणार होता घटस्फोट...
२ ऑक्टोबर २०२० रोजी सई आणि तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी सईने सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत तिर्थदीपसाठी 'माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हीच खरी सगळ्याची सुरुवात आणि शेवट आहे' असं लिहिलं होतं. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी सई आणि तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं. याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते आणि आज अखेर सोमवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा दिमाखदार विवाहसोहळा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने पार पडला.
सई आणि तिर्थदीप यांच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर या दोघांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. याविषय़ी तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखतदेखील दिली होती. “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो. काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार पॉझिटीव्ह होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय,” असं सईने या मुलाखतीत सांगितलं होतं.
bigg boss marathi finalist sai lokur ties the knot with tirthadeep roy