'बिग बॉस मराठी'चा चौथा सिझन 'या' महिन्यात होणार लाँच? Bigg Boss Marathi 4 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4

'बिग बॉस मराठी'चा चौथा सिझन 'या' महिन्यात होणार लाँच?

'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या सिझनने २६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) या पर्वाचा विजेता ठरला. बिग बॉसचा तिसरा सिझन चांगलाच गाजला. यातील प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर चर्चा झाली. जवळपास १०० दिवसांच्या मनोरंजनानंतर आता बिग बॉस मराठीचा पुढचा सिझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब म्हणजे चौथा सिझन नवीन वर्षात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस मराठी ४ हा एप्रिल २०२२ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या चौथ्या सिझनमध्ये प्रेक्षकांसाठी भरपूर सरप्राईज असतील. शिवाय यामध्ये कोणते कलाकार सहभागी होणार, याबद्दलची तयारीसुद्धा सुरू झाली आहे. (Bigg Boss Marathi 4)

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन हा जवळपास दोन वर्षांनंतर लाँच झाला होता. या सिझनला पहिल्या दोन सिझनपेक्षा खूप जास्त प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाचा विचार करूनच आता चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा विचार निर्मात्यांनी केला आहे. कोविड आणि लॉकडाउनमुळे प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनसाठी खूप प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र चौथ्या सिझनसाठी त्यांना फार थांबावं लागणार नाही, असं निर्माते ग्रँड फिनालेमध्ये म्हणाले होते.

हेही वाचा: 'तू करतेय ते चुकीचं की बरोबर..'; अल्लू अर्जुनचं समंथासाठी वक्तव्य

सांगलीचा विशाल निकम हा 'बिग बॉस मराठी ३'चा विजेता ठरला. विशालला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश मिळाला. या पर्वाचा उपविजेता जय दुधाणे ठरला. कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा यंदाचा तिसरा सिझन जोरदार गाजला होता. घरातील जोरदार भांडणं, नवनवीन टास्कने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. या कार्यक्रमात १०० दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील १५ कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात आदिश वैद्य आणि निथा शेट्टी हे वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे सहभागी झाले होते. टॉप ५ स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांच्यामध्ये मोठी चुरस होती. यामध्ये विशाल निकमने बाजी मारली. अतिशय थाटामाटात हा महाअंतिम सोहळा पार पडला.

Web Title: Bigg Boss Marathi Season 4 To Launch Soon In 2022 Here Are The Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top