'तू करतेय ते चुकीचं की बरोबर..'; अल्लू अर्जुनचं समंथासाठी वक्तव्य | Samantha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun and Samantha

'तू करतेय ते चुकीचं की बरोबर..'; अल्लू अर्जुनचं समंथासाठी वक्तव्य

आपल्या दमदार अभिनयकौशल्याच्या जोरावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) हिंदीतही आपली छाप सोडली. 'द फॅमिली मॅन २'मधील तिच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर आता करिअरमधील पहिल्याच आयटम साँगची ऑफर समंथाने स्वीकारली. 'स्टायलिश स्टार' अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटात तिने 'ओ अंटावा' या गाण्यावर डान्स केला. या आयटम साँगची ऑफर स्वीकारण्यापूर्वी समंथा खूप समंभ्रात होती. बराच विचार केल्यानंतर तिने त्यास होकार दिला. याबद्दल आता अल्लू अर्जुनने (Allu Arjun) प्रतिक्रिया दिली आहे.

एका कार्यक्रमात समंथाचे आभार मानत अल्लू अर्जुन म्हणाला, 'गाण्याला होकार देण्यासाठी तुझे खूप खूप आभार. मला माहितीये, सेटवर तुझ्या डोक्यात किती प्रश्न होते. हे गाणं करणं योग्य असेल की नसेल अशा संभ्रमात तू होतीस. त्यावेळी मी तुला फक्त एकच गोष्ट सांगितली. ती म्हणजे, माझ्यावर विश्वास ठेव आणि हे गाणं कर. त्यानंतर तू मला एकही प्रश्न विचारला नाहीस. माझ्यावर आणि चित्रपटाच्या टीमवर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. तू माझं मन जिंकलंस. ओ अंटावा हे गाणं जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे, त्याबद्दल तुझं अभिनंदन.' अल्लू अर्जुनच्या या वक्तव्यानंतर समंथानेही ट्विट केलं. 'आता मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवीन', असं ती म्हणाली.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट?

'पुष्पा' या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत रश्मिका मंदाना, फहाध फासिल आणि सुनिल यांच्या मुख्य भूमिका आहेत. तेलुगू भाषेत चित्रीत झालेला हा चित्रपट नंतर हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब करण्यात आला. पाच विविध भाषांमध्ये अल्लू अर्जुनचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पाच दिवसांत जगभरात २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जूनने चंदनाची तस्करी करणाऱ्या लॉरी ड्राइव्हरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा प्रदर्शित होणार आहे. पुढच्या डिसेंबर महिन्यात हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Whether Its Right Or Not Right Allu Arjun Thanks Samantha Ruth Prabhu Says You Won My Heart

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top