Salman Khan Bigg Boss OTT
Salman Khan Bigg Boss OTTEsakal

Bigg Boss OTT 2: आता रोजच होणार राडे अन् वाद बिग बॉस ओटीटीला झाली दणक्यात सुरुवात!

Published on

मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस आता टिव्हीनंतर ओटीटीवरही वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा शो अनेक नवीन बदलांसह सुरू झाला आहे.

बिग बॉसचे ओटीटीला काल दणक्यात सुरुवात झाली आहे, हा सिझन खास आहे कारण तो सलमान खान होस्ट करत आहे.

सलमान खानने 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीझनला धमाकेदार सुरुवात केली. 'हँगओव्हर' या गाण्यावर त्याने ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स देखील दिला. मात्र सलमानचा परफॉर्मन्स संपताच अभिनेत्री पूजा भट्ट स्टेजवर पोहोचली.

Salman Khan Bigg Boss OTT
Ketaki Chitale on Adipurush : केतकीकडून रावणाचा 'श्री रावण' असा उल्लेख; नव्या वादाला तोंड फोडलं!

'जनतेचा आवाज' म्हणून पूजा या शोमध्ये पोहोचली आहे. 'बिग बॉस OTT 2' मध्ये 13 स्पर्धक असतील. 12 स्पर्धक समोर आले आहेत आणि एक स्पर्धक 'जनता की आवाज' मधून निवडला आहे.

सलमानने सांगितले की यावेळी स्पर्धकांसोबत कंटेंट देखील ओटीटी असेल. त्यानंतर सलमानने 'बिग बॉस OTT 2' च्या जज पॅनलची ओळख करून दिली. सनी लिओनी, संदीप सिकंद, दिबांग, अजय जडेजा आणि एमसी स्टॅन यांच्या हस्ते घरात एंट्री करुन देण्यात आली.

Salman Khan Bigg Boss OTT
Father's Day 2023: बाबा जाऊ नको दूर! वडिलांसोबत नातं अधिक घट्ट करणारे 'हे' चित्रपट नक्की पहा..

यावेळी 'बिग बॉस OTT 2' मध्ये एक ट्विस्ट आहे. यावेळी स्पर्धकांना 'बिग बॉस चलनाचा वापर करायचा आहे. ज्याचा वापर ते अंथरुणापासून ते झोपण्यापर्यंत आणि रेशन, पाण्यापर्यंत खर्च करावे लागणार आहे.

बिग बॉस ओटीटी 2 मधील स्पर्धक देखील समोर आली आहे. ज्यात फलक नाज, जिया शंकर, अभिषेक मल्हान, आकांक्षा पुरी, सायरस ब्रोचा, मनीषा राणी, जाद हदीद, आलिया सिद्दीकी, बबिका धुर्वे, लॉर्ड पुनीत, अविनाश सचदेव आणि पलक पुरसवानी हे घरात लॉक झाले आहेत. ज्याच्यात आता नवीन युद्ध सुरु झाले आहे.

Salman Khan Bigg Boss OTT
Adipurush Box Office: प्रेक्षकांची नाराजी.. आकडा घसरला, दुसऱ्या दिवशी झाली फक्त इतकी कमाई

सर्व स्पर्धक जेव्हा शोमध्ये आले तेव्हा वेगळच वातावरण निर्माण झालं होत.

मात्र जेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी म्हणजेच आलिया सिद्दीकी एंट्री केली तेव्हा संपूर्ण वातावरणच बदललं. आलियाने स्टेजवर सांगितले की नवाजुद्दीन खूप सपोर्टिव्ह आहे आणि त्याच्या सांगण्यावरून ती 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये आली आहे.

आता शोमध्ये रोजच नवे नवे किस्से आणि राडे होणार आहेत जे प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहेत. 'बिग बॉस ओटीटी 2' पहिल्या सीझनप्रमाणे हा शो फक्त ऑनलाइन पाहता येणार आहे. Jio Cinemaवर फ्रिमध्ये असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com