esakal | Bigg Boss 13 :...यांनी गाजविला बिग बॉसचा 13वा सीझन
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-6.jpg

Bigg Boss 13 :...यांनी गाजविला बिग बॉसचा 13वा सीझन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : बिग बॉसच्या 13व्या सीझनचा विजेता अखेर मिळाला आहे. या सीझनच्या विजेत्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता होती. सिद्धार्थ शुल्का 'बिग बॉस'चं तेरावं पर्व अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने जिंकलं आहे. सिद्धार्थला ४० लाखांचे बक्षिस मिळाले आहे. हा सिझन सिध्दार्थ शुक्ला, रश्मी देसाई, शेहनाझ गिल, आसिम रियाझ यांनी चांगलाच गाजविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सलमान खान- बिगबॉस आणि सलमान खान हे समीकरण म्हणजे फुल एन्टेंरटेन्टमेंट. प्रेक्षकांना बिगबॉसचा होस्ट म्हणून सलमान खान यालाच पाहायला आवडते. सलमानने जवळपास 10 सिझन बिगबॉस होस्ट केले आहे. सलमानने कधी हसत-खेळत, मज्जा मस्ती करत, कधी ओरडून, कधी प्रेमाने समजावून सांगत सर्व कंटेस्टटला गाईड केले. कधी बिगबॉसच्या घरात जाऊन झाडू, पुसून भांडी घासून घरच्यांना काम करण्यास सांगितले. सलमान खानने यावेळी बिगबॉसचे 10 वर्ष पुर्ण केले.

सिध्दार्थ शुक्ला-  सिध्दार्थ  शुक्ला यांनी घरात आपल्या व्यक्तीमत्वाचे सर्व पैलू दाखवले आहेत. टॉयफॉईडमुळे आजारी पडल्यानंतरही त्याने शो सोडला नाही. आजारी असूनही त्यांने फाईटर प्रमाणे प्रत्येक टास्क केले. सिध्दार्थ शुक्ला नेहमी मित्रांसाठी आणि टिमसाठी खेळताना दिसला. यावेळी त्याचे खूप वाद झाले त्यांने  खूप अग्रेशन दाखविले पण बरऱ्यादा त्याचा सयंम सुटला. पण, यातूनच तो शिकत राहिला.  सिध्दार्थने कधी निरागस,  लहान मुलाप्रमाणे  मस्ती केली तर कधी हॅन्डसम हंक प्रमाणे फ्लर्टिंग केले.  प्रेक्षकांना त्याचा हाच अंदाज भावला.

शेहनाझ गिल- पंजाब की कटरीना कैफ म्हणून पंजाबी इंडस्टीमधून बिगबॉसच्या घरात एंन्ट्री घेतली.  शेहनाझने बिगबॉसच्या घरात एंन्ट्रीपासून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणली म्हणूनच ती बिगबॉसच्या या सिझनची एन्टरटेंमेट क्विन ठरली. शेहनाझ आणि सिध्दार्थची मैत्री प्रेक्षकांना इतकी भावली की त्यांनी #sidNaaz हा हॅशटॅग तयार केला.  तिचा हा बिगबॉसचा सिझन चढ उतार आले पण ती नेहमी हसत राहिली आणि सर्वांना हसवत राहिली. 

आमिरने करीनाला 'व्हॅलेंटाईन डे' विश केलं आणि म्हणला....

रश्मी देसाई : रश्मी देसाई टेलव्हिजन बहू म्हणून घरात आली. बहू बनी बेब अदांजमध्ये तिने प्रेक्षकांची मने जिंकली. सिझनच्या पहिल्या पडावमध्ये रश्मी बिगबॉसच्या घरातून बाहेर जावे लागले होते. पण  वाईल्ड कार्ड म्हणून तिने पुन्हा एंट्री घेत स्वत:चा गेम स्ट्रॉंग केला आणि टॉप सिक्स मध्ये पोहचली. रश्मी आणि सिध्दार्थ शुक्ला खूप वाद झाले. तिचा सहारा म्हणून आलेल्या तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे नात्यावरच प्रश्न निर्माण झाले. सारे काही घडल्यानंतरही तिने स्वत:ला सावरले आणि गेम फोकस केला.

आसिम रियाझ : आसिम रियाझ हा प्रेक्षकांना माहित नसलेला चेहरा म्हणून घरात आला पण, लाखो चाहाते त्यांने कमावले. आसिमची मैत्री दिसली आणि दुश्मनी देखील. टास्कमध्ये त्यांनी अग्रेशन दिसले पण त्याच बरोबर खिलाडू व्रुती देखील दिसली.  हिमांशी खुरानासाठी त्यांने खुल्लम खुला प्रेम व्यक्त केले.  रॅप करत कधी कॉमेडी करत प्रेक्षकांची मने जिंकली.

loading image