esakal | शमिताला मायशाची मागावी लागली माफी...
sakal

बोलून बातमी शोधा

शमिताला मायशाची मागावी लागली माफी कारण...

शमिताला मायशाची मागावी लागली माफी कारण...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारा रियॅलिटी शो म्हणून बिग बॉसचे नाव घ्यावे लागेल. सध्या या रियॅलिटी शो चा 15 वा सीझन सुरु आहे. त्यात सहभागी स्पर्धकांनी प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. अल्पावधीतच त्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या बिग बॉसच्या घरात सगळं आलबेल आहे असं नाही. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये एक खेळ खेळण्यात आला होता. त्यात घरवाले आणि जंगलवासी असे दोन गट करण्यात आले होते. त्या दरम्यान झालेल्या वादामध्ये काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात सहभागी झालेल्या शमिताला एका कारणामुळे मायशाची माफी मागावी लागली आहे.

त्या खेळामध्ये घरवाले आणि जंगलवाले असे दोन गट करण्यात आले होते. जंगलवासी यांनी डाकूची भूमिका करत घरवासी यांना लक्ष्य केले. या दरम्यान झालेल्या वादामध्ये मोठी भांडणे बिग बॉसच्या घरात झाली. घरवासींना जंगलवासींयांना त्यांच्या घराकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता बनविण्यास विरोध करायचा होता. असे सांगण्यात आले होते. यावेळी शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हे मायशा अय्यर शूज घेऊन बाहेर गेले. त्यांना काही करुन घराबाहेर करण्याचा प्लॅन होता. त्यामुळे शमितानं स्टोअर रुममध्ये जाऊन मायशाचे शूज पेंट केले. त्यामुळे ती नॉमिनेट झाली.

टास्क पूर्ण झाल्यानंतर शमितानं मायशा अय्यरशी बातचीत केली. त्यामध्ये तिनं सांगितलं की, मला माहिती होतं की, तू खूप रागालेली आहे. मला माहिती आहे कुणी दुसरी व्यक्ती जेव्हा आपल्या पादत्राणांना हात लावते त्याचा राग येणं साहजिकच आहे. त्यानंतर मायशानं ही गोष्ट प्रतिकला सांगितली. मात्र याबद्दल काहीही माहिती नव्हतं. प्रतिक आणि शमिताचे या गोष्टीविषयी बोलणे झाले तेव्हा प्रतिकनं मायशाविषयी शमिताला सांगितलं. तिचे आई वडिल दोन्हीही नाहीत. त्यामुळे तु जे तिला बोलली ते चूकीचं आहे. यावरुन शमिताला तिची चूक कळली. आणि तिनं मायशाची माफी मागितली.

हेही वाचा: Bigg Boss OTT: बिग बॉसच्या घरात शमिता शेट्टीचीच चर्चा; स्पर्धकांशी ओढून घेतला वाद

हेही वाचा: शिल्पा शेट्टीचा नवा लूक! व्हाइट साडीवर पदराचे हटके Draping

loading image
go to top