Bigg Boss 15: 'जो आपल्या सख्ख्या बहिणीचा नाही तो'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 15: 'जो आपल्या सख्ख्या बहिणीचा नाही तो'...
Bigg Boss 15: 'जो आपल्या सख्ख्या बहिणीचा नाही तो'...

Bigg Boss 15: 'जो आपल्या सख्ख्या बहिणीचा नाही तो'...

मुंबई - वाद, भांडण, आरोप प्रत्यारोप हाच ज्या मालिकेचा टीआरपी आहे अशा बिग बॉसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात खळबळ सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हा रियॅलिटी शो बंद करण्याची चर्चा सुरु झाली होती. त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे गेल्या सीझनच्या तुलनेत यंदाच्या सीझनला कमी प्रतिसाद प्रेक्षकांकडूम मिळाला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसांपासून बिग बॉसनं पुन्हा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातील काही स्पर्धक हे वैयक्तिक पातळीवर जात एकमेकांवर आरोप करु लागले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बिग बॉसच्या अपकमिंग शो मध्ये प्रेक्षकांना एक नवीन गोष्ट पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे जय भानुशाली आणि विशाल कोटियान यांच्यातील वाद. तो वाद एवढा टोकाला गेला आहे की त्यामुळे त्यांनी एकमेकांवर एकेरी आरोप केले आहेत. त्या एपिसोडचा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यालाही प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत. जय भानुशाली हा त्याच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे शो मध्ये दिसत नसल्याचा प्रश्न चाहत्यांनी त्याला विचारला आहे. त्यावर जय भानुशाली त्याला म्हणतो की, मी त्यावर फारसा विश्वास ठेवत नाही. मी फार लहान आहे.

यासगळ्यात विशाल कोटियान आणि जय भानुशाली यांच्यात वेगळाच वाद रंगला आहे. शो च्या सुरुवातीपासून त्या दोघांमध्ये वाद रंगल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी विशालनं आपण जयचा मित्र असल्याचे यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे. एका प्रसंगामध्ये विशाल आणि जयचा वाद होतो. त्यावेळी जय त्याला म्हणतो जो आपल्या बहिणीचा झाला नाही कुणाचाच होणार नाही. यावर विशालला राग येतो आणि तो ही जयला सुनावतो. असा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत.

loading image
go to top