'हा' आहे बिग बॉसच्या आवाजामागचा चेहरा | Bigg Boss | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss season 15

'हा' आहे बिग बॉसच्या आवाजामागचा चेहरा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोने गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळवली. प्रत्येक पर्वात नवनवीन स्पर्धक आणि ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळतात. या स्पर्धकांना साम, दाम, दंड, भेद करून घरातील आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं. या शोमधील बिग बॉसच्या आवाजाचे असंख्य चाहते आहेत. अत्यंत बाणेदार असा हा आवाज नेमका कोणाचा आहे, हा प्रश्न अनेकांना पडला असेल. घरातील स्पर्धकांनाही अनेकदा या आवाजामागच्या चेहऱ्याला बघण्याची उत्सुकता असते. बिग बॉसच्या आवाजामागील खरा चेहरा आहे वॉईस आर्टिस्ट विजय विक्रम सिंग Vijay Vikram Singh.

विजय सिंगने २००९ मध्ये वॉईस ओव्हर क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. २०१० मध्ये त्याला एक मेल आला, ज्यामध्ये एका वॉईस आर्टिस्टची गरज असल्याचं निर्मात्यांनी सांगितलं होतं. विजयने स्वत:च्या आवाजाचा सीडी त्यांना पाठवला आणि त्यात त्याची निवड झाली. त्यानंतर ऑडिशन देण्यासाठी त्याला बोलावण्यात आलं होतं. ऑडिशन दिल्यानंतर दोन दिवसांत त्याची बिग बॉसच्या आवाजासाठी निवड झाली. हा माझ्या करिअरमधील सर्वांत मोठा टर्निंग पॉईंग होता, असं विजय सिंग म्हणतो.

हेही वाचा: पोलिसाचा किसिंग व्हिडीओ व्हायरल झाला अन्..

"'बिग बॉस'च्या आवाजासाठी निवड झाल्याचं समजताच आनंदाने आणि उत्साहाने मी उड्याच मारत होतो. एखाद्या लहान मुलासारखं मी वागत होतो. बिग बॉसशिवाय मी इतरही शोजसाठी काम करतो. पण बिग बॉसमुळे मला खरी ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही," असं तो म्हणाला. विजय सिंगने 'फॅमिली मॅन' आणि 'स्पेशल ओपीएस' यांसारख्या काही वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.

loading image
go to top