Bigg Boss 16: 'अगं सोड त्याला गुदमरेल तो!' टीनाची अब्दुवर बळजबरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: 'अगं सोड त्याला गुदमरेल तो!' टीनाची अब्दुवर बळजबरी

Bigg Boss 16: बिग बॉसच्या 16 व्या सीझनमध्ये जे काही घडते आहे ते पाहून आता नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला आहे. यंदाच्या सीझनमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे ते दुबईच्या अब्दु रोजिकनं. त्याच्या दिसण्यावर अनेकजण फिदा आहेत. मात्र बिग बॉसच्या घरातील सहभागी स्पर्धकांचा त्याला विरोध होताना दिसतो आहे. बिग बॉसमध्ये काहीही होऊ शकतं, कोण कुणावरही कुरुघोडी करु शकतं, यासगळ्यात अब्दु रोझिकला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचे दिसून आले आहे.

अब्दुला त्रास देणाऱ्यांवर आता बिग बॉसनं लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्याचं झालं असं की, टीनानं अब्दु सोबत जे काही केलं त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. त्यांनी तिला टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीना तू जे काही करते आहेस ते प्रेम नाही तर बळजबरी आहे. त्याला अत्याचार म्हणतात. अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसत आहे. टीनानं जबरदस्तीनं अब्दुची गळाभेट घेतली. अब्दु नाही म्हणत असताना टीनानं त्याची गळाभेट घेणे हे नेटकऱ्यांना आवडलेले नाही. अब्दुला टीनानं जे काही केलं ते आवडलं नाही. त्यानं तसे टीनाला बोलूनही दाखवले.

यासगळ्यात नेटकऱ्यांनी टीनाची शाळा घेतली आहे. एका युझर्सनं त्या व्हिडिओवर कमेंट करत, टीना अगं त्याला सोड, तो गुदमरुन जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय इतर काही नेटकऱ्यांनी देखील टीनाला पुढील काळात सावधगिरीनं बिग बॉसच्या घरात राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून टीनानं वेगवेगळ्या प्रकारे अब्दुला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: Aamir Khan Advt: 'आमिरनं लाज सोडली'! 'घरजावई' जाहिरातीवरुन नेटकऱ्यांचा भडका

काही झालं तरी अब्दु मात्र सगळ्यांच्या नजरेत आला आहे. त्याच्यावर नेटकरी कौतूकाचा वर्षाव करु लागले आहेत. फार कमी वेळेत तो टीआरपीमध्ये आल्यानं बिग बॉसच्या घरातील अनेकांचा तीळपापड झाला आहे. बिग बॉसमधील रथी महारथी स्पर्धकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त करत त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र अब्दुचा स्वभाव पाहता तो येत्या काही दिवसांत बिग बॉसमध्ये हिट लिस्टवर येण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!