esakal | बिकिनीतील अभिनेत्रीच्या 'तिथे' उमटला हाताचा ठसा
sakal

बोलून बातमी शोधा

Bikini photo gets viral of Urvashi Rautela.jpg

तिचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. पण, या फोटोमुळे तिचे कौतुक न होता उलट ती जोरदार ट्रोल होत आहे. असं काय आहे तिच्या या बिकनी परिधान केलेल्या फोटोत की ट्रोल होत आहे...

बिकिनीतील अभिनेत्रीच्या 'तिथे' उमटला हाताचा ठसा

sakal_logo
By
वृत्तसंस्था, वृत्तसंस्था

अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरील तिच्या सर्व अकाऊंटवर प्रचंड अॅक्टीव्हही असते. वेगवेगळ्या अदांमधील तिचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. अशाच प्रकारे तिचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. पण, या फोटोमुळे तिचे कौतुक न होता उलट ती जोरदार ट्रोल होत आहे. असं काय आहे तिच्या या बिकनी परिधान केलेल्या फोटोत की ट्रोल होत आहे...

'वहिनी' म्हणताच, जेनेलिया खुदकन हसली

उर्वशी नेहमीच तिचे सगळेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सध्या मालदीवमध्ये सुट्या एन्जॉय करत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत तिने आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली आहे व डोक्यात फूल हॅट घातलं आहे, हातात हॅट आणि गॉगल आहे. पांढऱ्याशुभ्र बीचवर काढलेल्या या फोटोत ती अत्यंत सुंदर दिसत आहे. या फोटोला तिने 'मालदिवच्या पाण्यामुळे मला झळाळी मिळते, मालदीव म्हणजे स्वर्ग आहे.' असे कॅप्शन दिले आहे. मात्र, बारकाईने बघितल्यास तिच्या अंगावर कोणच्या तर हाताचा ठसा आहे आणि तो अशा जागेवर आहे की फोटो बघितल्या बघितल्या तिच्या फॅन्सनी कमेंट करून तिला सवाल केले आहेत.

अखेर अनुष्काचं ठरलं! या दिग्दर्शकाशी बांधणार लग्नगाठ

बिकिनी घातलेल्या उर्वशीच्या चक्क पृष्ठभागावर एका हाताचा ठसा दिसतोय.  नीट बघितल्यास उजव्या बाजूला हा हाताचा ठसा स्पष्ट दिसतो. तिच्या या फोटोमुळे तिच्या अदांचे कौतुक करण्याऐवजी तिला ट्रोलच मोठ्या प्रमाणात केलं जातंय. तो हाताचा ठसा कोणाचा, हा फटका कोणी मारला अशा कमेंट्स या फोटोवर येत आहेत. त्यामुळे या फोटोची खूप चर्चा होत आहे.

उर्वशी सध्या जॉन अब्राहमसोबत पागलपंती चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  

loading image