गुरुदत्त यांचे जीवन रुपेरी पडद्यावर; लवकरच प्रदर्शित होणार बायोपिक...

संतोष भिंगार्डे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शीतल तलवार आणि भावना तलवार यांनी दिग्दर्शक व निर्माते तसेच अभिनेते गुरुदत्त यांचा बायोपिक काढण्याचा निर्णय घेतला आहे. 'प्यासा' असे त्या बायोपिकचे नाव आहे.

मुंबई : 'प्यासा', 'कागज के फूल', 'साहब बीबी और गुलाम' अशा बहुचर्चित चित्रपट गुरुदत्त यांनी दिग्दर्शित केले. संवेदनशील आणि आशयघन चित्रपट बनविणारा दिग्दर्शक अशी त्यांना रसिकमान्यता मिळाली. सिनेमावर त्यांची असलेली पकड आणि संगीताची त्यांना असलेली जाण त्यांच्या कलाकृतींतून दिसली. त्यांचा एकूणच जीवनप्रवास अत्यंत थरारक आणि वैशिष्टयपूर्ण घटनांनी भरलेला आहे. आता त्यांचा हा एकूणच जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत बायोपिक येत आहेत. 

सदनिकेतील गळतीसाठी चक्क महापालिकेने बजावली नोटीस; याप्रकारची पहिलीच घटना...

शीतल तलवार आणि भावना तलवार यांनी दिग्दर्शक व निर्माते तसेच अभिनेते गुरुदत्त यांचा बायोपिक काढण्याचा निर्णय घेतला आहे. 'प्यासा' असे त्या बायोपिकचे नाव आहे. गेली सात वर्षे या चित्रपटावर भावना तलवार काम करीत होत्या. आता ते पूर्ण झाले आहे. भावना तलवारच हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. 

तब्बल चार महिने त्यांनी प्रतिक्षा केली; अखेर फोन आला आणि ते गावी परतले...

गुरुदत्त यांचा जन्म 9 जुलै 1925 मध्ये बंगळूर येथे एका गरीब कुटुंबात झाला. वसंत कुमार शिवशंकर पादुकोन असे त्यांचे खरे नाव. हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक आणि अभिनेते होते. मात्र त्यांचे खासगी आयुष्य वादातीत होते. या चित्रपटात एकूणच या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.  
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: biopic on film director gurudatta will release soon, bhavana talwar will directs the film