लाडाची लेक! सहा महिन्याच्या मुलीसाठी बिपाशाचं तब्बल 92 लाखाचं गिफ्ट Bipasha-Karan Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bipasha Basu Karan Singh Grover Car video viral

Bipasha-Karan Video : लाडाची लेक! सहा महिन्याच्या मुलीसाठी बिपाशाचं तब्बल 92 लाखाचं गिफ्ट

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू हे प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. करण आणि बिपाशाने 2015 मध्ये डेट केले होते आणि 2016 मध्ये लग्न केले होते. आता दोघेही पालक झाले आहेत. त्यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे देवी स्वागत केले. बिपाशाची मुलगी ही जन्मापासूनच चर्चेत आहे. तिचं नावही अनेकांना खुप आवडलं.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत आणि हे जोडपे त्यांच्या आयुष्याशी आणि लाडक्या लेकीशी संबधित प्रत्येक अपडेट त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात.

दरम्यान, या जोडप्याने नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. त्यांनी AudioQ7 खरेदी केली आहे. बिपाशाने कारचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

व्हिडिओमध्ये बिपाशा आणि करण त्यांची नवीन कार घेऊन खूप आनंदी दिसत आहेत. या जोडप्याच्या या व्हिडिओवर त्यांचे चाहतेही भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

बिपाशा-करणने मुलगी देवीसाठी केली नवीन कार खरेदी

बिपाशा बसूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन कारचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती करण सिंग ग्रोवरसोबत Audi Q7 ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे.

कार घेण्यापूर्वी या जोडप्याने केक कापून आनंद साजरा केला. या व्हिडिओमध्ये बिपाशाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या शर्टसोबत व्हाइट जीन्स घातली आहे. तिच्या चेहऱ्यावरील हास्य खुपच कमाल आहे.

या जोडप्याने शोरूममध्ये कव्हर काढून कारचे उद्घाटन केले आहे. व्हिडिओ शेयर करत तिने लिहिले की, "देवीची नवीन राईड. दुर्गा दुर्गा. धन्यवाद @Audi हे आमच्यासाठी इतके खास बनवल्याबद्दल #audic7 #devibasugrover नवीन कार." बिपाशाने याला 'देवीची नवीन सवारी' म्हटलं आहे.

Audi Q7 ही कार खूप लक्झरी आहे आणि तिची किंमत देखील खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार त्याची किंमत 84.70 लाख ते 92.30 लाख रुपये आहे.

दोघांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. त्याचे चाहते दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर काही जण 'देवी' चं अभिनंदन करत आहेत.

लेकीच्या जन्मामुळे बिपाशा जरी चित्रपट जगतापासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. अनेकदा तिच्या चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. बिपाशा बासूची मुलगी देवी खूप गोंडस आहे. तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होतात.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करण सिंग ग्रोवर 'फाइटर' आणि '3 देव' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच वेळी, बिपाशा बसू शेवटची 2020 मध्ये 'डेंजरस' या वेब शोमध्ये दिसली होती.