kriti Sanon At Sita Gufa Mandir: आदिपुरुषमधली सीता पोहोचली नाशिकच्या पंचवटीत, क्रितीचा सीता गुंफा मंदिरातला व्हिडिओ व्हायरल

Kriti Sanon At Sita Gufa Mandir
Kriti Sanon At Sita Gufa MandirEsakal

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रभास सध्या त्यांच्या आदिपुरुष या चित्रपटासाठी दिवसांपासून चर्चेत आहेत. सुरवातीला चित्रपटाचा टीचर रिलिज झाला अन् रिलीजनंतर कलाकारांचे लूक वादात आले त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वाढवल्यामुळे हा चित्रपट चर्चेत आला होता.

Kriti Sanon At Sita Gufa Mandir
IPL CSK Win: धोनीची CSK जिंकल्यावर विकीने डोक्याला हातच लावला, धम्माल व्हिडिओ एकदा पाहाच, Video Viral

मात्र आता काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला. या चित्रपटात क्रिती सीतेच्या भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत प्रभास रामच्या भूमिकेत तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची दोन गाणी नुकतीच रिलिज झाली असून कालच या चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणं देखील रिलिज झालं. जे प्रेक्षकांना खुपच आवडलं आहे.

दरम्यान, क्रिती सेनॉनचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटो आणि व्हिडिओमध्ये क्रिती सेनन एका मंदिरात आरती करतांना दिसली.

Kriti Sanon At Sita Gufa Mandir
Naseeruddin Shah: 'आजकाल मुस्लिमांचा द्वेष करणं ही फॅशन...': नसीरुद्दीन शाहांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

आता क्रिती सेननने नाशिकच्या पंचवटीतील सीता गुंफा मंदिरात पोहोचली. तिने माता सितेचे आशीर्वाद घेतले. क्रिती सेननने मंदिरात जाऊन आरती केली आणि यावेळी तिच्यासोबत जागरूक परंपराही दिसली. सचेत-परंपरा सिया राम उच्चारताना राम भक्तीत तल्लीन झालेले दिसले.

नाशिकच्या पंचवटीच्या सीता गुफा मंदिरात पोहोचलेली कृती सेनन पांढऱ्या रंगाच्या पेस्टल सलवार सूटमध्ये दिसली. कपाळावर बिंदी आणि डोक्यावर ओढणी घेतलेली क्रिती राम सिया राम म्हणत भक्तित तल्लीन झालेली दिसली. तर परंपरा लाल साडी आणि सचेतने लाल कुर्ता परिधान केला होता.

नाशिकच्या पंचवटीच्या सीता गुफा बद्दल सांगायचं झालं तर सिता मातेच्या या गुहेबद्दल असं सांगितलं जातं की या गुहेने भगवान राम आणि सीता यांनी वनवासात आश्रय दिला होता. सीताजींचे आशीर्वाद घेतल्यानंतर क्रितीने काळाराम मंदिराला भेट दिली आणि मंदिरात भजन आणि आरती केली.

Kriti Sanon At Sita Gufa Mandir
IPL CSK vs GT: सारा दीदी बेवफा है.. शुभमन गिलची टीम हरल्यावर आनंद साजर केल्याने सारा झाली ट्रोल

आदिपुरुष चित्रपटातील 'राम सिया राम' हे गाणे प्रभू राम आणि सीता यांच्यातील नात्याबद्दल आहे. आता हा चित्रपट 6 जून रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे पण त्याआधी 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये तो प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com