Bipasha Basu’s daughter Devi: ना डिस्को ना लोरी! बिपाशाच्या लेकीला आवडते हनुमान चालिसा... व्हिडिओ व्हायरल

bipasha basu and karan singh grover Daughter Devi
bipasha basu and karan singh grover Daughter Devi Esakal
Updated on

Bipasha Basu’s daughter Devi: बॉलिवूडचे स्टार कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे नेहमी चर्चेत असतात. सध्या हे कपल त्यांची लाडकी लेक देवीमुळे चर्चेत असतात. देवी ही तिच्या जन्मापासूनच लाईमलाईटमध्ये असते.

बिपाशा देखील लेकीबद्दल अनेक अपडेट चाहत्यांसोबत शेयर करत असते. बिपाशाने तिच्या लेकीचे नाव जितके आध्यामिक ठेवले आहे तितकीच ती मुलीला योग्य असे संस्कार देखील देते.

निसर्गाचे सौंदर्य दाखवण्यापासून हिंदू धर्मातील तिच्या कथा सांगण्यापर्यंत, बिपाशा आणि करण यांना त्यांची मुलगी देवीला नेहमीच काही ना काही चांगल्या गोष्टी शिकवत असतात. आता नुकतच बिपाशाने देवीचा झोपतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

bipasha basu and karan singh grover Daughter Devi
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

या व्हिडिओमध्ये देवीचे वडिल करण सिंग ग्रोव्हर हनुमान चालीसा पाठ करताना दिसत आहे. देवीच्या 'बेडटाइम रूटीन'ची झलक दिसते. बिपाशा बसूने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण सिंग ग्रोव्हर झोपण्यापूर्वी आपली लेकीला हनुमान चालीसा ऐकवताना दिसतोय.

देवी देखील शांतपणे हनुमान चालीसा ऐकते आणि वडिलांच्या चेहऱ्याला स्पर्श करते आणि आवाज करताना दिसतेय.

बिपाशा बासूने हा व्हिडिओ शेयर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की "बेडटाइम विथ पापा, मामा आणि देवी"

bipasha basu and karan singh grover Daughter Devi
Amitabh Bachchan: जया, रेखा कि हेमा! बिग बींची आवडती अभिनेत्री कोण? स्वत: केला खुलासा

सध्या देवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी आणि कलाकार तिचं कौतुक करताना थकत नाहीत. तिच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी बिपाशाच्या आणि करणने दिलेल्या संस्काराचे कौतुक करत आहे.

काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या मुलीवर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्टची सहा तासांची शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला होता. देवीच्या जन्मानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की त्यांच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्रे आहेत. त्यानंतर ती तिन महिन्याची असताना तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

bipasha basu and karan singh grover Daughter Devi
Gadar 2 Box Office Collection: रिलिजच्या सातव्या दिवशी गदर2 चं वादळ शमलं! आत्तापर्यंत केली इतक्या कोटींची कमाई..

बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी देवीचे स्वागत केले. तेव्हापासून दोघेही खूप आनंदी आहेत आणि काही दिवसांपूर्वी, देवी 9 महिन्यांची झाली. त्याचे फोटो देखील बिपाशाने शेयर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com