Birthday Special : अनिल कपूरच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य !

Birthday special anil kapoors fitness secret
Birthday special anil kapoors fitness secret
Updated on

मुंबई : 'माय नेम इज लख्खन' हे गाणं लागताच स्वत:ला नाचण्यापासून रोखणे कठीण आहे. या गाण्याने आठवण होते ती अभिनेचा अनिल कपूर. आज अनिल कपूरचा 63 वा वाढदिवस आहे. अनिलला त्याच्या वाढदिवसानिमित्त सकाळ टीमकडून शुभेच्छा. अनिल हा 63 वयाचा यंगमॅन आहे. वय विसरायला लावणारा असा त्याचा फिटनेस आहे. पण या फिटनेस मागचं रहस्य आहे तरी काय याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जाणून घ्या या यंगमॅमच्या फिटनेसचं सिक्रेट. 

अनिल कपूरला तीन मुलं आहेत यावर कदाचितच कोणी विश्वास ठेवेल. प्रत्येक चित्रपटामध्ये फ्रेश लुक, फिटनेस आणि जबरदस्त डान्स असचं अनिलचा परफॉरमन्स असतो. पण, हा फिटनेस योगायोगाने आलेला नाही. अनिल हे त्यामागे प्रचंड मेहनत घेतात. नियमित व्यायाम, डाएट, जीम हे काटेकोरपणे अनिल पाळतो. त्याशिवाय अनिलला सायकल चालवणे खूप आवडते. गेल्या 8 वर्षांपासून तो सायकल नियमित चालवत आहे. मोकळ्या वेळामध्य़े तो मेडिटेशनही करतो. 

व्यायाम 
अनिल कपूर दररोज व्यायाम करतो. रोज 2 तास तो जीमसाठी देतो आणि आठवड्यातील सहा दिवस न चुकता जीमला जातो. दहा मिनिटांचं कार्डियो, 20 मिनिटांचं 'फ्री वेट' हा योगचा प्रकार हे त्याच्या व्यामामध्ये समाविष्ट आहे. वर्कआऊटनंतर तो  आर्वजुन प्रोटीन शेक घेतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागांना फिट आणि लवचिक ठेवण्यासाठी अनिल विविध प्रकारचे व्यायाम करतो. 

हेल्दी लाइफस्टाइल
व्यायाम, जीम आणि योग यांच्यासह अनिल स्वत: खूप हेल्दी राहतात. कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता जास्तीत जास्त मोकळं आणि खुलेपणाने जगण्याचा प्रयत्न करतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

What's on my mind you ask? Just a whole lot of travel, work, work & more work! #thegoodlife!

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on

डाएट
अनिलला साऊथ इंडियन जेवण खूप आवडतं. इडली, सांभर, चटणी, रसम भात व दही हे त्याच्या आवडीचं आहे. नाश्त्यामध्ये हेल्दी ओट्स, अंडी, ऑमलेट आणि फळं हे तो खातो. तर दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी डाळ आणि त्यासोबत चपाती व भात. त्याचसोबत सॅलेडही आर्वजुन खातो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

The “what’s for lunch” face! #sundaymood

A post shared by anilskapoor (@anilskapoor) on

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com