esakal | बर्थडे स्पेशल: जेव्हा आयुष्मानला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना, 'ही' गोष्ट करण्याची झाली होती मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

aayushman

एक काळ असा होता जेव्हा करिअरसाठी संघर्ष करत असलेल्या आयुष्मानलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. 

बर्थडे स्पेशल: जेव्हा आयुष्मानला करावा लागला होता कास्टिंग काऊचचा सामना, 'ही' गोष्ट करण्याची झाली होती मागणी

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- आयुष्मान खुराना बॉलीवूडमधील एक असा अभिनेता आहे ज्याने त्याच्या छोट्या कारकिर्दीत मोठी कामगिरी केली. 'अंधाधुन' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या आयुष्मान खुराना आज त्याच्या वाढदिवस साजरा करत आहे. सिनेमे निवडण्याच्या बाबतीत आयुष्मानची नेहमीच स्तुती केली जाते. त्याच्या सिनेमांमध्ये कथा आणि अभिनय यावर जास्त मेहनत असते ज्यामुळे त्याचे सिनेमे बॉक्स ऑफीसवर हिट ठरतात. मात्र एक काळ असा होता जेव्हा करिअरसाठी संघर्ष करत असलेल्या आयुष्मानलाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. 

हे ही वाचा: नवाजुद्दीनची पत्नी आलियाने नवाज आणि कुटुंबियांविरोधात नोंदवला जबाब, मुंबईत दाखल केली होती एफआयआर  

आयुष्यान खुरानाने सांगितलं होतं की, 'एकदा कास्टिंग डिरेक्टर मला म्हणाला होता की त्याला त्याचा प्रायवेट बॉडी पार्ट पाहायचा आहे. आयुष्मान म्हणाला हे ऐकून मी जोरात हसायला लागलो. नंतर म्हणालो, काय बोलयतोय यार तु. तु खरंच सिरीयस आहेस का? त्यानंतर मी त्याला यासाठी नकार दिला.'आयुष्मान खुराना २०१४ मध्ये एमटीव्ही रोडिज शोमध्ये दिसून आला होता. हा शो जिंकल्यानंतर आयुष्मानने एँकरिंगच्या दुनियेत पाऊल ठेवलं.

२०१२ मध्ये आयुष्मानचा पहिला सिनेमा 'विकी डोनर' रिलीज झाला आणि सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर रिलीज झालेले त्याचे तीनही सिनेमे फ्लॉप ठरले. २०१५मध्ये 'दम लगा के हईशा'मध्ये आयुष्मान आणि भूमी पेडणेकर दिसून आले आणि या सिनेमामुळे त्याच्या करिअरला एक उंची मिळाली. या सिनेमासाठी त्याने खूप मेहनत केली होती. या सिनेमापाठोपाठ मग 'बरेली की बर्फी', 'शुभ मंगल सावधान', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'आर्टिकल १५' आणि 'ड्रीम गर्ल' सारख्या सिनेमांनी आयुष्मानला सुपरस्टारच्या यादीत समाविष्ट केलं. त्यामुळे प्रेक्षकांना आता आयुष्मानकडून नेहमीच वेगळ्या विषयांची अपेक्षा असते.   

birthday special of ayushmann khurrana when he faced casting couch