नवाजुद्दीनची पत्नी आलियाने नवाज आणि कुटुंबियांविरोधात नोंदवला जबाब, मुंबईत दाखल केली होती एफआयआर

navazuddin with wife aaliya
navazuddin with wife aaliya

मुंबई- अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यामधील घटस्फोट आणि कौटुंबिक छळाचं प्रकरण दिवसेंदिवस ताणलं जात आहे. नुकतंच नवाजची पत्नी आलियाने पोलिस स्टेशलमध्ये नवाज आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तिचा जबाब नोंदवला आहे. 

उत्तर प्रदेश पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवाजची पत्नी आलियाने रविवारी नवाजुद्दीनचं मुळ घर असलेल्या बुढाना येथील पोलिस स्टेशनमध्ये तिचा जबाब नोंदवला आहे. आलियाने तिचा हा जबाब नवाज आणि त्याच्या कुटुंबियांनी लावलेल्या आरोपाच्या आधारावर नोंदवला आहे. २७ जुलै रोजी आलियाने मुंबईतील एका पोलिस स्टेशनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केली होती. हे प्रकरण मुंबईतील नसल्याने मुजफ्फरनगरमधील बुढाना येथे ट्रान्सफर केलं गेलं. या एफआयआरनुसार आलियाला तिचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबईहून बुढानाला जावं लागलं. 

आलियाने तिच्या जबाबामध्ये तेच आरोप पुन्हा लावले आहेत जे तिने मुंबईतील एफआयआरमध्ये सांगितले होते. आलियाने आरोप केला आहे की २०१२ मध्ये नवाजच्या भावाने तिच्यासोबत छेडछाड केली होती. याबद्दल तिने त्याच्या कुटुंबियांकडे देखील तक्रार केली होती. मात्र हे प्रकरण वाढू नये यासाठी कुटुंबियांनी गप्प राहायला सांगितलं. कुटुंबियांचं म्हणणं होतं की ही घरातली गोष्ट आहे तेव्हा ती घरातंच सोडवली गेली तर उत्तम. मात्र त्याच्यावर घरातील सदस्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. 

दुसरीकडे नवाजचे कुटुंबिय आलियाच्या सगळ्या आरोपांना फेटाळून लावत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आलिया खोटं बोलतेय आणि त्यांच्या घरात अशाप्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही. आलियाने जेव्हा तिचा जबाब बुढानाला जाऊन नोंदवला त्यावेळी नवाज शहरात नव्हता. अर्थात आलियाने नवाजच्या शहरात जाऊन तिचा जबाब नोंदवला असला तरी ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली नाही. आलियाने कोर्टात नवाजपासून घटस्फोट हवा असल्याचा अर्ज देखील केला आहे. यानंतरच दोघांमध्ये खूप सवाल-जवाब होत आहेत.   

nawazuddin siddiqui wife aaliya recorded her statement at budhana police station against the actor  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com