
अक्षय,शाहरुख आणि अजयच्या तंबाखू जाहिरातीवर भाजपा नेत्याची संतप्त प्रतिक्रिया
अक्षय,शाहरुख आणि अजयच्या जाहिरात प्रकरणाने सध्या सगळीकडे चर्चेला उधान आले आहे.विमल आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने जेथे तरूण पिढी व्यसनाधिन होतेय आणि शासनाला जेथे व्यसनमुक्ती अभियान चालवावे लागतात तेथे यांसारखे अभिनेते या पदार्थांची जाहिरात करतात.त्यामुळे अशा अभिनेत्यांना पद्मश्री पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात यावे असा आग्रह गोवा भाजपाच्या वैद्यकिय सेलचे निमंत्रक शेखर साळकर यांनी नरेंद्र मोदींना केला.
देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.आणि अशा वेळी हे अभिनेते देशाला व्यसन करण्यास प्रवृत्त करत आहेत.(Akshay Kumar)मग अशा वेळी यांना पद्मश्री सारखा मोठा सन्मान मिळू नये असे मत साळकर यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून व्यक्त केले आहे.(Ajay Devgan)अक्षय,शाहरुख (Shahrukh Khan)आणि अजय देवगण यांची गणना लोकप्रसिद्ध अभिनेत्यांमधे केली जाते.लोक यांना पसंत करतात आणि त्यांचे अनुकरणही करतात.अशा वेळी यांनी अशा व्यसनी पदार्थांची जाहिरात करणे म्हणजे तरुण पिढीला भरकटवून त्यांना व्यसन करण्यास प्रवृत्त करणे होय.
डॉक्टर साळकर ट्वीट करत पुढे म्हणाले,'आतापर्यंत अमिताभ बच्चन,अजय देवगण आणि शाहरुख कर्करोग पसरवणाऱ्या विमल,घुटका या पदार्थांची जाहिरात करत होते आता अक्षयही त्यांच्या टोळीत सामील झालाय.अक्षयसाठी माझ्याकडे बोलायला शब्द उरले नाहित.पण मला वाईट वाटतेय की,अक्षय हा पद्म पुरस्कार विजेता आहे.'
नुकताच, अक्षय कुमार विमल पान मसालाची जाहिरात करताना दिसला होता, ज्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.अक्षयला अशा धोकादायक गोष्टींची जाहिरात करताना पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान, आता अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांची माफी मागितली आहे.
Web Title: Bjp Member Claims On Akshayajay And Shahrukh That Do They Deserve Padmshreetobaco Vimal Pan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..