भाजप आमदाराने विराट कोहलीला दिला अनुष्कापासून घटस्फोट घेण्याचा सल्ला..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी नुकताच प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.

मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. दोघेही अनेकदा मजा-मस्करी करतानाचे फोटो-व्हिडिओ सोशल साईटवर अपलोड करताना पाहायला मिळतात. मात्र नुकताच विराट कोहलीला अनुष्का शर्मापासून घटस्फोट घेण्याचा सल्ला भाजपा आमदारांनी दिला आहे. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल मात्र हे खरं आहे.

हे ही वाचा: 'या' सिनेमाचा सेट तोडल्याने बजरंग दलच्या कालकर्त्यांना अटक

भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी नुकताच प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. ते म्हणाले, 'विराट कोहली देशभक्त आहे. देशासाठी तो खेळतो. त्याने अनुष्काला लवकर घटस्फोट द्यावा.' नंदकिशोर गुर्जर यांचं म्हणणं आहे की अनुष्काने 'पाताल लोक' वेबसिरीज बनवून राष्ट्रद्रोही काम केलं आहे.  ज्यासाठी तिच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार 'पाताल लोक' वेबसिरीज मध्ये, बालकृष्ण वाजपेयी नामक अपराधीशी संबंधित नेत्यासोबत एका रस्त्याचं उद्धाटन करताना नंदकिशोर यांचा आणि इतर भाजपा नेत्यांचा फोटो दाखवला गेला आहे. ते सध्या भाजपा आमदार आहेत आणि त्यांच्या परवानगी शिवाय त्यांच्या फोटोचा धर्म आणि जात नष्ट करण्या-या 'पाताल लोक' वेबसिरीजमध्ये वापर करुन राष्ट्रद्रोही काम केलं आहे. 

अनुष्का शर्माने तिची 'पाताल लोक' वेबसिरीज रिलीज केल्यापासून ती वादात आहे. या वेबसिरिजमधील जात-धर्मावर केलेल्या भाष्यांमुळे संबंधित लोकांच्या भावन दुखावल्या गेल्या आहेत. या वेबसिरीजमध्ये गाजियाबादमधील राज्यसभेचे खासदार अनिल अग्रवाल यांच्या फोटोचा वापर त्यांच्या परवानगीशिवाय केला आहे. त्यामुळे एकंदरीतंच या वेबसिरीजच्या कथानकाशी संबंधित निर्माती अनुष्का शर्माच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.  

bjp mlv nand kishor gurjar advise virat kohli to divorce with anushka sharma


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp mlv nand kishor gurjar advise virat kohli to divorce with anushka sharma