esakal | अर्जुन कपूरनंतर मलायकालाही काेरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

अर्जुन कपूरनंतर मलायकालाही काेरोनाची लागण

देशात गत चोवीस तासांत नव्वद हजार 633 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्जुन कपूरनंतर मलायकालाही काेरोनाची लागण

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याची प्रेयसी व अभिनेत्री मलायका अरोरा हिलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने याबद्दलची माहिती नुकतीच दिली होती. ज्याप्रमाणे अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. त्याचप्रमाणे मलायकाने देखील आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले आहे. 

तीन दिवसांपूर्वी अर्जुनने शूटिंगला सुरुवात केली होती. शूटिंगदरम्यान फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर अर्जुनचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शूटिंग थांबवण्यात आली आहे. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यानंतर आता मलायकाचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत तिने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून जाहीर केले आहे.

सातारा जिल्ह्यात नाेकरीची माेठी संधी; नर्स, वॉर्डबॉय, वैद्यकीय अधिकारी हवेत

मलायका म्हणते, मला बरे वाटत आहे. मी होम क्वारंटाइन राहणार असून वैदयकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार घेणार आहे. चाहत्यांनी काळजी करु नये सुरक्षित राहावे. दरम्यान देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 41 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात गत चोवीस तासांत नव्वद हजार 633 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतची ही एका दिवसांतील सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगण्यात येत आहे.

सातारकरांनो, मला माफ करा.. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवलीय