बॉबी देओल म्हणाला 'अशी कल्पनाही केली नव्हती...'

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 26 November 2020

'आश्रम' या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची भूमिका साकरली. या निमित्ताने बाबा राम रहिमच्या कृष्णकृत्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला. या भूमिकेतील बॉबी देओल मात्र सगळ्यांच्या पसंतीस पडला आहे. 

मुंबई- अभिनेता बॉबी देओल ब-याच काळानंतर स्क्रीनवर परतला. 'आश्रम' या वेबसीरीजमध्ये बॉबी देओलने बाबा राम रहिमची भूमिका साकरली. या निमित्ताने बाबा राम रहिमच्या कृष्णकृत्यांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला. वेश्याव्यवसाय, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अनेक गैरप्रकार बाबा राम रहिमच्या आश्रमातून चाललेले उघड झाले होते. दुष्कर्माच्या गुन्ह्यात बाबा राम रहिम सध्या तुरुंगात आहे. या भूमिकेतील बॉबी देओल मात्र सगळ्यांच्या पसंतीस पडला आहे. 

हे ही वाचा: अमृता खानविलकर ते उषा नाडकर्णी, हिंदी मालिकांमध्ये छाप सोडणारे मराठी कलाकार    

‘आश्रम'च्या माध्यमातून बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केलं. बॉबी देओलने बाबा राम रहीमची निगेटीव्ह प्रतिमा या वेबसिरीज मधून साकारली. दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. या खलनायकी भूमिकेला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ब-याच दिवसांनी बॉबी देओलचा अप्रतिम अभिनय यात पाहायला मिळाला. या निगेटीव्ह भूमिकेला पॉझिटीव्ह प्रतिसाद दिल्याबद्दल बॉबी देओलने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

अभिनेता बॉबी देओलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये आश्रम वेबसिरीजमधील त्याची भूमिका ही खरतर वादग्रस्त होती. तेव्हा या भूमिकेला लोक पसंत करतील का अशी शंका बॉबील होती मात्र या प्रेक्षकांचा दोन्ही सिझनला मिळालेला प्रतिसाद पाहता त्याने चाहत्याना धन्यवाद दिले आहेत.  बॉबीने पोस्ट करत म्हटलं आहे की,  ''आपल्याला नकारात्मक रोलमध्ये बघून प्रेक्षक सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी कल्पनही केली नव्हती. आतापर्यंत अशी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारली नव्हती. त्यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा असेल, याचा अंदाज येत नव्हता. पण प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं आहे, त्याबद्दल धन्यावद'' अशी भावना त्याने या पोस्टमधून व्यक्त केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

बॉबी देओल आता आश्रमच्या तिस-या सिझनसाठी उत्सुक आहे. याही सिझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. केवळ बॉबीच नाही तर प्रेक्षकांमध्ये देखील पुढे काय होणार हे पाहण्याची उत्सुकता असल्याने तिस-या सिझनची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत.   

bobby deol looks forward to aashram season three  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bobby deol looks forward to aashram season three