Video Viral: घटस्फोटानंतर आमीर खान - किरण राव पुन्हा एकत्र? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aamir khan and kiran rao
Video Viral: घटस्फोटानंतर आमीर खान - किरण राव पुन्हा एकत्र?

Video Viral: घटस्फोटानंतर आमीर खान - किरण राव पुन्हा एकत्र?

Aamir Khan: मिस्टर परफेक्शनिस्ट (Bollywood Actor) आमीर खान हा जसा त्याच्या अभिनयामुळे (Bollywood News) चर्चेत असतो तसा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसून आला आहे. आमीर खानची दोन लग्न झाली. त्यात त्यानं गेल्या वर्षी आपली दुसरी पत्नी किरण रावला (Kiran Rao) घटस्फोट दिला आणि त्याच्या तिसऱ्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तिला आमीरनंच त्याच्या दंगल नावाच्या चित्रपटातून ब्रेक दिला होता त्या फातिमा सना शेख (Fatima Sana shekh) सोबत आमीर रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. अजून त्याच्याकडून त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.

गेल्या वर्षी आमिरनं किरण रावसोबत घटस्फोट (Aamir khan kiran rao divorce) घेतला. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. आमिरच्या फॅन्सला धक्का बसला होता. आता आमिर आणि किरण राव पुन्हा एकत्र येणार का अशा प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे. त्या दोघांचा एकत्रित असलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये किरण राव आणि आमिर खान हे एकत्र दिसत आहे. यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना प्रश्नही विचारले आहेत.

हेही वाचा: कोण होती गंगुबाई ? Gangubai Kathiawadi | Alia Bhatt |Bollywood Movie

या वर्षी आमीरचा लाल सिंग चढ्ढा नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये त्याच्यासोबत करिना कपूरही दिसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता तो प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या ऑस्कर विजेत्या चित्रपटावर आधारित लाल सिंग चढ्ढाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये आमीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा: Salman Khan Birthday: 55 व्या बर्थडे दिवशी खास संदेश देणाऱ्या सल्लूमियाँविषयीच्या खास गोष्टी