ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ऐश्वर्याला काय विचारलं?

बच्चन कुटूंबियांची सून ऐश्वर्या रायला (bollywood actor Aishwarya Rai Bachchan) देखील ईडीनं (Enforcement Directorate) चौकशीसाठी बोलावून घेतलं
ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ऐश्वर्याला काय विचारलं?

बच्चन कुटूंबियांची सून ऐश्वर्या रायला (bollywood actor Aishwarya Rai Bachchan) देखील ईडीनं (Enforcement Directorate) चौकशीसाठी बोलावून घेतलं आणि बॉलीवूडमध्ये एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. पनामा कागदपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अमिताभ बच्चन यांचे नाव देखील चर्चेत आले होते. त्यामुळे आता ऐश्वर्या रॉयचं नाव आल्यानं त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ काढण्याचे काम नेटकरी करत आहे. आज दिवसभर ऐश्वर्या रायच्या नावाची चर्चा सुरु होते. पनामा प्रकरणात कोणत्या कारणास्तव ऐश्वर्याचे नाव आले, तिचा यासगळ्याशी काय संबंध, अमिताभ, अभिषेक यांना या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रकार तर नाही ना असे सवाल नेटकरी सोशल मीडियातून विचारताना दिसत आहे. bollywood actor Aishwarya Rai Bachchan was questioned by the Enforcement Directorate

आज दुपारी ऐश्वर्या ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाली होती. त्यावेळी तिची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यावेळी ऐश्वर्याला नेमके काय प्रश्न विचारण्यात आले हे आपण आता जाणून घेणार आहोत. 2005 मध्ये अमिक पार्टनर्स यांनी स्थापन केलेली ब्रिटिश व्हर्जिन आयलंड ही कंपनी बेकायदेशीर आहे, मात्र तुम्ही त्याच्याशी संबंधित आहात हे कसे काय? तुमच्या त्या कंपनीशी संबंध कसा आला, ज्या मोसॅक फोरेनसनं फर्म रजिस्टर केली ती कुठे आहे याविषयी काही माहिती आहे का, या कंपनीच्या संचालक मंडळावर तुम्ही आहात. केवळ तुम्हीच नाही तर तुमचे वडील कोटीद्दाडिरामन्ना राय कृष्णा राय, तुमची आई कविता राय आणि तुमचा भाऊ आदित्य राय हे सगळे याच्याशी जोडले गेले आहेत. हे सगळे कसे काय? याविषयी काय सांगाल?

ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ऐश्वर्याला काय विचारलं?
ऐश्वर्या,बिग बींवर करचुकवेगिरीचा आरोप,पनामा पेपर लीक प्रकरणी दिल्लीत चौकशी
ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ऐश्वर्याला काय विचारलं?
ऐश्वर्या राय बच्चन ED कार्यालयात, कागदपत्रांची तपासणी सुरू

यासारखे वेगवेगळे प्रश्न ऐश्वर्याला विचारण्यात आल्याचे यावेळी दिसून आले. त्यामध्ये तिच्या शेअर्स मार्केटशी संबंधित प्रश्न होते. विशेष म्हणजे ऐश्वर्याचे सासरे बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांनी आपल्या जबाबामध्ये आपल्याला या प्रकरणाविषयी काही माहिती नसल्याचे सांगितले होते. मी कुठल्याही प्रकारची कंपनी स्थापन केली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. 2008 मध्ये तुमच्या नावावर जी कंपनी होती त्याविषयी काहीच अपडेट नाहीत. ती त्यावेळी का कार्यरत नव्हती, आतापर्यत जे व्यवहार करण्यात आले त्याविषयी आरबीआयची परवानगी घेण्यात आली होती का...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com