esakal | मुलीचा बर्थ डे, पपांकडून वेबसीरिजचं गिफ्ट; अजय 'रूद्र'च्या भूमिकेत

बोलून बातमी शोधा

bollywood actor ajay devgn debut remake
मुलीचा बर्थ डे, पप्पांकडून वेबसीरिजचं गिफ्ट; अजय 'रूद्र'च्या भूमिकेत
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये खाकी वर्दीला ग्लॅमर देण्यात अनेक अभिनेत्यांचे योगदान आहे. मात्र यासगळ्यात एका अभिनेत्याची पोलिसाची क्रेझ अद्याप भारतीय प्रेक्षकांच्या मनात आहे. त्या अभिनेत्याचे नाव अजय देवगण. अजयनं त्याच्या सिंघम चित्रपटातून पोलिस अधिका-याची भूमिका साकारली होती. त्याला पुरेपुर न्याय दिला होता. ती भूमिका प्रेक्षकांना कमालीची भावली. त्यामुळे सिंघम ही अजयची वेगळी ओळख झाली. त्यानंतर अजयनं सिंघम रिटर्न्समध्ये पोलिस अधिका-याची भूमिका साकारली होती. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज अजयच्या मुलीचा नीसाचा जन्मदिवस आहे. त्यानं तिला अनोखी भेट दिली आहे.

अजयनं नीसाला जन्मदिनी त्याच्या पहिल्या वेबसीरिजचं गिफ्ट दिलं आहे. त्यानं तशी अधिकृत घोषणाही केली आहे. त्याच्या मालिकेचं नाव रुद्र - द एज ऑफ डार्कनेस असे आहे. त्यात तो रुद्र नावाच्या पोलीस अधिका-याची भूमिका साकारणार आहे. अजयची ही पहिली वेबसीरिज असणार आहे. प्रसिध्द ब्रिटीश वेबसीरिज लुथर या मालिकेचा रिमेक म्हणून अजयच्या नव्या मालिकेकडे पाहिले जात आहे. आता या मालिकेची सर्वांनाच उत्सुकता असणार आहे. ती केव्हा प्रदर्शित होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी अधिक माहिती देताना अजय म्हणाला, मला नेहमीच वेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडते. एखादी गोष्ट जर आवडली तर त्या गोष्टीचं सिनेमात कसं रुपांतर करता येईल याकडे मी अधिक लक्ष देतो. या मालिकेच्या निमित्तानं पुन्हा नवीन काही करण्याची संधी मिळाली आहे. त्याचा मला आनंद आहे.

लुथर या मालिकेत प्रमुख भूमिका इदरीस एल्बानं साकारली होती. तर रुद्रमध्ये ती भूमिका अजय देवगण करणार आहे. भारतात आता मनोरंजनाच्या व्याख्या बदलत चालल्या आहेत. सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मची चलती आहे. हे नवं माध्यम शिकण्याची गरज आहे. त्याच्यातील अनेक गोष्टी आव्हानात्मक आहेत मात्र त्यामुळे आपल्याही बदलत्या जगासोबत अनेक गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. असे अजयनं यावेळी सांगितले.

एखाद्या पोलिसाची भूमिका करणं हे आता माझ्यासाठी नवीन नाही. यापूर्वी अनेक चित्रपटातून मी त्या भूमिका केल्या आहेत. नव्या मालिकेसाठी मी उत्सुक आहे. यावेळी माझी भूमिका जरा डार्क स्वरुपाची आहे. त्यासाठी थोडासा होमवर्कही करावा लागणार असल्याचे अजयनं सांगितले.