Amrish Puri: अमरिश पुरी कोणत्या अभिनेत्याला म्हणाले 'गंदी नाली का किडा'?

आपल्या दमदार आवाज आणि भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱे कलाकार म्हणून अमरीश पुरी यांची ओळख आहे.
Amrish Puri news
Amrish Puri news esakal

Amrish Puri Birth Anniversary: आपल्या दमदार आवाज आणि भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱे कलाकार म्हणून अमरीश पुरी यांची ओळख आहे. केवळ (Bollywood Actor) भारतातच नाही तर जगभरामध्ये त्यांचे चाहते आहेत. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ चर्चेत असलेले व्हिलन म्हणून अमरीश पुरी यांचे नाव नेहमीच घेतले जाते. आज त्यांची बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. त्यानिमित्तानं बॉलीवूडमध्ये त्यांच्याविषयीच्या काही आठवणींना आपण उजाळा देणारा आहोत. अमरीश पुरी (Amrish Puri) आणि बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्यासोबत मोठे वाद झाले होते. तो वाद एवढा टोकाला गेला होता की, त्यांनी त्या अभिनेत्याला अर्वाच्य शब्दांत ठणकावून सांगितले होते. आज तो अभिनेता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. (Amrish Puri Birth Anniversary)

गोविंदा भलेही मोठा अभिनेता असेल मात्र तो सेटवर वेळेचे पालन करताना अनेकदा चुकत असल्याचे दिसून आले होते. याविषयी त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी मुलाखतीतून त्याच्याबाबत ही तक्रार केली होती. गोविंदाचे कित्येक (Bollywood Actor Govinda) कलाकारांसोबत त्यावरुन वादही झाले होते. यात ज्येष्ठ आणि प्रसिद्ध अभिनेते अमरीश पुरी यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्यात सेटवर फक्त हाणामारी व्हायची बाकी राहिली होती. ती भांडणं गोविंदाच्या करिअरला मोठं वळण देणारी ठरली. अमरीश पुरी यानंतर गोविंदासोबत काम न करणचं पसंद केलं. ज्या चित्रपटांमध्ये लीड भूमिकेत आहे त्याच चित्रपटांसोबत इतर चित्रपटांत दुय्यम भूमिका साकारताना देखील गोविंदानं वेळेचे पालन केले नसल्याचे सांगितले जाते.

Amrish Puri news
Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

त्याचे झाले असे की, एका चित्रपटाच्या निमित्तानं अमरीश पुरी आणि गोविंदा हे एकत्र काम करत होते. त्या सेटवर गोविंदाला दिग्दर्शकांना जी वेळ दिली होती त्या वेळेत तो काही आला नाही. बराचवेळ अमरीश पुरीसह अनेक ज्येष्ठ कलाकार हे गोविंदाची वाट पाहत होते. सकाळी नऊची वेळ असताना गोविंदा त्या सेटवर सायंकाळी सहा वाजता आला. यावेळी अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला. आणि त्यांनी गोविंदाला बोलणं सुरु केलं. तो वाद टोकाला गेला. त्याप्रसंगी रागाच्या भरात गोविंदाला अमरीश पुरी यांनी गंदी नाली का किडा असे म्हटले होते. त्याची बराचकाळ बॉलीवूडमध्ये चर्चाही होती.

Amrish Puri news
Viral Video: चक्क थिएटरच्या छतावर चढून केला शिल्पानं डान्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com