त्या घटनेनंतर अमरिश पुरी-आमिर खान यांनी एकत्र केलं नाही काम

अमरिश पुरी यांचा राग अनावर झाला आणि..
amrish puri ,aamir khan
amrish puri ,aamir khanfile image

हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते अमरिश पुरी (amrish pur) यांचा जन्म 22 जून 1932 रोजी पंजाबमधील जालंधर येथे झाला. बॉलिवूडमधील खलनायक म्हणून ओळख मिळवणारे अमरिश यांच्या आईचे नाव वेद कौर आणि वडिलांचे नाव लाला निहाल चंद पुरी आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अमरिश यांनी खलनायकी भूमिका साकारली. ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. अमरिश पुरींसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी काम केले. त्यापैकीच एक म्हणजे आमिर खान (aamir khan). मात्र एका घटनेनंतर अमरिश पुरी आणि आमिर यांनी पुन्हा एकत्र काम केलंय नाही. (bollywood actor amrish puri fight with aamir khan)

‘जबरदस्त’ हा चित्रपट १९८५ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील एका सीनमुळे अमरिश पुरी आणि आमिर खान यांच्यामध्ये वाद झाला होता. यामध्ये अमरिश पुरी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आमिर खानने या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले होते. या चित्रपटाच्या एका सीनचे शूट करत असताना आमिरने अमरीश यांना काही सूचना दिल्या. मात्र अमरिश यांनी आमिरच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अमरिश पुरी करत असलेले काम आमिरच्या पसंतीस पडले नव्हते. तो वारंवार त्यांना सूचना देत होता. अखेर आमिरच्या या सूचनांमुळे अमरिश यांना राग अनावर झाला. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

amrish puri ,aamir khan
Khatron Ke Khiladi 11: सापांसोबत खेळतेय निक्की, डोळ्यावर झुरळं

जबरदस्त या चित्रपटाचे दिग्दर्शन नासिर हुसैन यांनी केले होते. या चित्रपटाच्या त्या सीनवेळी अमरिश पुरी यांनी सर्वांसमोर आमिरला ओरडले होते. त्यानंतर त्यांना त्यांची चूक लक्षात आली. नंतर त्यांनी एकमेकांची माफीदेखील मागितली. मात्र या घटनेनंतर अमरिश आणि आमिर या जोडीने कधीच एकत्र काम केलं नाही.

amrish puri ,aamir khan
'भावा गर्लफ्रेंडला iPhone पाहिजे', सोनूनं दिलं उत्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com