
'काश्मिरी फाईल्स' वडिलांना अर्पण: अनुपम खेर यांनी सांगितलं कारण
मुंबई - अभिनयातील, संवादातील आणि व्यक्तिमत्वातील वेगळेपणा अभिनेता अनुपम खेर (anupum kher) यांनी नेहमीच जपली आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे अनुपम खेर हे त्यांच्या सामाजिक, राजकीय भूमिकांसाठी ओळखले जातात. सध्या ते त्यांच्या एका चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. त्या चित्रपटाचं नाव काश्मिरी फाईल्स (kashmiri files) असे आहे. त्यांनी हा चित्रपट आपल्या वडिलांना अर्पण केला आहे. त्यांसंबंधीची एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर (social media) शेयर केली आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.
अनुपम खेर (anupum kher) यांनी त्यांच्या काश्मिरी फाईल्स (kashmiri files) या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे. त्या पोस्टर्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे. यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय. याआधी अग्निहोत्री यांची 'द ताश्कंद फाइल्स' (the tashkant files) फिल्म चर्चेत होती. 'कू'वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना खेर यांनी म्हटले आहे, 'हा सिनेमा, त्यातला माझा परफॉर्मन्स, मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अर्पण करतो. माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे. जे 30 हून आधिक वर्षे लपवलं गेलं. हे सत्य आता तुमच्यासमोर येईल 26 जानेवारीला.' सिनेमात अनुपम खेर पुष्कर नाथ पंडित नावाचं पात्र साकारत आहेत.
हेही वाचा: बिग बॉस १४ फेम निक्की तांबोळी बॉलिवूडमध्ये दिसणार!
पुष्कर नाथ हे तत्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक असतात. 19 जानेवारी 1990 च्या एका भयाण रात्री त्यांना काश्मिरहून आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह परागंदा व्हावे लागते. पुढे जे काही होते त्याचे चित्रण सिनेमात केले आहे. कू वर पोस्ट करताना खेर यांनी #RightToJustice आणि #Pushkar असे हॅशटॅगही दिले आहेत
हेही वाचा: Podcast: ऐश्वर्या राय बच्चनच्या मागे ED चा फेरा ते तुकाराम सुपेंच्या घरात २ कोटींचं घबाड
Web Title: Bollywood Actor Anupam Kher Kashmiri Files Movie Dedicate His Father Post Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..