
रिक्षावाल्यानं प्रसिद्ध अभिनेत्याची केली बोलती बंद, भगवद गीतेचे दिले धडे
मुंबई - बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत ते त्यांच्या सोशल मीडियामुळे चर्चेत असतात. त्यांनी शेयर केलेल्या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. अनुपम खेर (Anupam Kher) हे बॉलीवूडमधील ((bollywood) ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांचा चाहतावर्ग हा जगभर पसरलेला आहे. त्यांच्या अभिनयाची दखल हॉलीवूडनं देखील घेतली आहे. खेर हे सध्या एका टेलिव्हिजन शो मध्ये होस्टिंग करत आहेत. त्याचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. सध्य़ा ते एका त्यांच्या व्हिड़िओमुळे चर्चेत आले आहे. त्यामध्ये रिक्षावाल्यानं (auto driver) त्यांना चकीत करुन टाकलं आहे. यापूर्वी देखील अनुपम खेर यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिड़िओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
अनुपम खेर हे कधी काश्मीरमधील निसर्गाचा आनंद लुटताना दिसतात. तर कधी श्रीनगरमधल्या रस्त्यांवरून चालताना व्यक्तींशी संवाद साधतानाही पाहायला मिळतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांना एका रिक्षाचालकानं अवाक केलं आहे. त्यामुळे अनुपम यांनाही आश्चर्य वाटलं आहे. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांचा नेहमीप्रमाणे मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आपल्या इस्टांग्रावरुन शेयर केलेल्या त्या व्हिडिओमध्ये त्यांनी भूपती देवदास नावाच्या ऑटो चालकाशी संवाद साधला आहे.
हेही वाचा: मुंबईत आजही मी भाड्याच्या घरात राहतो- अनुपम खेर
त्या प्रवासामध्ये अनुपम खेर यांनी भूपती यांच्याशी वेगवेगळ्या गोष्टींवर संवाद साधला. त्यावेळी गप्पांच्या ओघात त्यांचा विषय भगवत गीतेवर आला. तेव्हा भूपती यांनी त्यांना गीतेतील काही अध्यायातील ओव्या म्हणून दाखवल्या. ते ऐकून अनुपम खेर यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. भूपती यांनी खेर यांना चंदीपाठ ऐकवला. यावर खेर यांनी सोशल मीडियावर देवदास भूपती यांचा तो व्हिडिओ शेयर करुन त्यांचे कौतूक केले आहे. यामुळे देवदास यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. तुम्ही मला भेटलात हे माझं भाग्य या शब्दांत खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हेही वाचा: ''आई तु या जगातील सर्वात पुढारलेली महिला आहेस,दुलारी रॉक''- अनुपम खेर
Web Title: Bollywood Actor Anupam Kher Viral Video Auto Driver Bhagwad Gita Lesson
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..