'माझ्या पतीची आणि तुमची हेअर स्टाईल बाकी'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'माझ्या पतीची आणि तुमची हेअर स्टाईल बाकी'...
'माझ्या पतीची आणि तुमची हेअर स्टाईल बाकी'...

'माझ्या पतीची आणि तुमची हेअर स्टाईल बाकी'...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - केवळ बॉलीवूड नाहीतर हॉलीवूडमध्ये देखील ज्यांच्या अभिनयाची भुरळ चाहत्यांना पडली. ज्या अभिनेत्याला तु कोणत्याही अँगलनं हिरो वाटत नाही म्हणून चित्रपटामध्ये काम दिलं जात नव्हतं. अशा अनुपम खेर यांच्या जीवनाची यशोगाथा काही वेगळीच आहे. ते नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रम आणि रियॅलिटी शो च्या माध्यमातून ही गोष्ट सांगत असतात. अशावेळी त्यांच्या चाहत्यांच्या दृष्टीनं ही मोठी महत्वाची गोष्ट असते. अनुपम हे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असणारे अभिनेते आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

सध्या इंस्टावर अनुपम खेर यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरुन त्यांना चाहत्यांनी काही गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तो फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. अनुपम यांनी तो फोटो शेयर करताना त्याला कॅप्शन दिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, मला हा फोटो कमालीचा आवडला आहे. आशा आहे की, तुम्हालाही तो आवडेल. चाहत्यांनी त्या फोटोला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. त्यामुळे अनुमप खेर हे चर्चेत आले आहे. अनुपम यांच्या त्या फोटोला आतापर्यत 21 हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे. आणि मोठ्या प्रमाणावर कमेंटही केल्या आहेत.

एका युझर्सनं लिहिलं आहे की, माझ्या पतीची हेअरस्टाईल देखील तुमच्यासारखीच आहे. त्यामुळे मला तुमची हेअर स्टाईल फार आवडते. एका युझर्सनं लिहिलं आहे की, आपल्याला देवाच्या कृपेनं खूपच चांगली हेअर स्टाईल मिळाली आहे. आपण त्याचे जतन करुन ठेवा. अनुपम, अद्वितीय आणि सुंदर अशी प्रतिक्रिया आणखी एकानं केली आहे. यासगळ्यामुळे अनुपम चर्चेत आले आहे. यापूर्वी एक पोस्ट शेयर करताना अनुपम यांनी लिहिले होते की, ज्यांना स्वप्न पाहणं आवडतं त्यांना दिवस छोटा वाटायला लागतो.

हेही वाचा: अभिनेते अमिर खान कुटुंबासह सिंधुदुर्गात

loading image
go to top