esakal | एकेकाळी ट्रेनमध्ये गिटार वाजवून पैसे कमवायचा आयुषमान खुराना
sakal

बोलून बातमी शोधा

ayushmann khurrana

एकेकाळी ट्रेनमध्ये गिटार वाजवून पैसे कमवायचा आयुषमान खुराना

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसताना अभिनेता आयुषमान खुरानाने Ayushmann Khurrana स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या प्रत्येक चित्रपटात त्याने चौकटीबाहेरच्या भूमिका आणि विषय स्वीकारले आहेत. 'अंधाधून' या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी आयुषमानला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास काही सोपा नव्हता. 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावल्यानंतर आयुषमानने त्याच्या खासगी आयुष्यातील काही किस्से सांगितले होते. कॉलेजमध्ये असताना ट्रेनमध्ये गिटार वाजवून पैसे कमावल्याचंही त्याने यावेळी सांगितलं.

ट्रेनमध्ये गिटार वाजवून तू पैसे कमावयचा असं मी ऐकलं होतं, ते खरं आहे का, असा प्रश्न कपिलने आयुषमानला विचारला होता. त्यावर होकारार्थी उत्तर देत आयुषमान म्हणाला, "होय, हे खरं आहे. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझे मित्र चंदीगड इंटरसिटी ट्रेनच्या द्वितीय श्रेणीतून प्रवास करायचो. तेव्हा प्रवासादरम्यान आम्ही ट्रेनमध्ये गिटार वाजवून गाणी गात होतो. आमची गाणी प्रवाशांनाही आवडत होती. ते आम्हाला पैसे द्यायचे. एके दिवशी आम्ही जवळपास हजार रुपये कमावले होते." ट्रेनमध्ये गिटार वाजवून मिळालेल्या पैशांतून मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेल्याचंही आयुषमानने यावेळी सांगितलं.

हेही वाचा: मुनमुनसोबत अफेअरच्या चर्चांवर राजचं सडेतोड उत्तर

आयुषमानने २००४ साली 'एमटीव्ही रोडिज' या टेलिव्हिजन रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. २०१२ साली त्याने 'विकी डोनर' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्याने 'दम लगा के हैशा', 'बरेली की बर्फी', 'शुभमंगल सावधान', 'बधाई हो', 'ड्रीम गर्ल', 'शुभमंगल ज्यादा सावधान', 'अंधाधून', 'आर्टिकल १५', 'बाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

loading image
go to top