Govinda Dance Video: गोविंदाचा कडक डान्स! फॅन्स म्हणाले, पुष्पापेक्षाही खतरनाक...|Bollywood Actor Govinda New song | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Govinda New song dance

Govinda Dance Video: गोविंदाचा कडक डान्स! फॅन्स म्हणाले, पुष्पापेक्षाही खतरनाक...

Bollywood Govinda News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याचा डान्स म्हटल्यावर बॉलीवूडमधले भले भले डान्सर फिके पडतात. अशा डान्सर गोविंदाची अदाच काही वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Social media news) झाला आहे. त्याला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली आहे. त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्या डान्सची तुलना ही (Entertainment News) पुष्पाच्या अल्लु अर्जुनशी केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गोविंदानं बॉलीवूडमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 90 च्या दशकांत गोविंदाचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात त्याच्या डान्सला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूडमधील लोकप्रिय डान्सर म्हणून गोविंदाची वेगळी ओळख त्याच्या चाहत्यांना परिचित आहे.

गोविंदाचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ चाहत्यांच्या (Viral News) कौतुकाचा विषय आहे. त्यामध्ये त्यानं अभिनेत्री जुही खानसोबत डान्स केला आहे. कित्येक वर्षांपासून ज्याच्या नृत्यानं चाहते भारावले गेले होते अशा (Govinda Dance) गोविंदाचा डान्स पाहून पुन्हा एकदा चाहत्यांनी त्याच्याविषयीच्या रंजक आठवणींना उजाळा दिला आहे. हिरो नं 1, कुली नं 1, आंटी (Bollywood Actor) नं 1, हसिना मान जायेगी, सारख्या चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आणि आपल्या नृत्यानं त्यांना भारावूनही टाकले. बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची डान्सर कलाकार मंडळी ही देखील गोविंदाला आपला आदर्श मानतात.

हेही वाचा: IIFA Viral: बच्चन परिवाराचा डान्स चर्चेत, नेटकऱ्यांकडून वाहवा

ऋतिक रोशन, प्रभुदेवा, टायगर श्रॉफ, शाहिद कपूर वरुण धवन अशी काही कलाकारांची नावं सांगता येतील. गोविंदा रॉयल्स नावाच्या युट्युबवर हा व्हिडिओ नेटकऱ्यांना पाहता येईल. जुही खान सोबत गोविंदा थिरकताना दिसतो आहे. त्याच्या त्या डान्सला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस् दिल्या आहेत. एकानं तर पुष्पापेक्षाही भयानक डान्स गोविंदानं केला आहे. त्याची एनर्जी कौतुकास्पद म्हणावी लागेल. गोविंदाच्या त्या व्हिडिओला आतापर्यत हजारो लाईक्स आणि लाखो व्ह्युज आल्या आहेत.

हेही वाचा: Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

Web Title: Bollywood Actor Govinda New Song Dance Viral Fans Crazy Pushpa Se Bhi Bhayanak

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment
go to top