Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...|Tollywood Vs Bollywood Vikram Kamal Haasan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tollywood Vs Bollywood Vikram Kamal Haasan

Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

Bollywood Vs Tollywood: कमल हासन यांच्या विक्रम नावाच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तीन दिवसांत दीडशे कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे. (Bollywood News) विक्रममध्ये कमल हासन यांची मुख्य भूमिका असून त्यांच्या जोडीला विजय सेतूपती आणि फहाद फाजिल अभिनेत्यांनी जबरदस्त भूमिका (vikram movie) साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपटांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यात गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला पुष्पा असो किंवा यावर्षीच्या आरआरआर, वल्लीमाई, केजीएफ आणि आताचा विक्रम या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. यासगळ्यात बॉलीवूडची पिछेहाट झाली असून दरम्यानच्या काळात हिंदी विरुद्ध टॉलीवूड असा संघर्षही दिसून आला आहे.

बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) फारसे प्रभावी ठरत नसल्याची ओरड गेल्या (Kamal Haasan) काही दिवसांपासून सुरु झाली आहे. साऊथच्या चित्रपटांचे ज्या पद्धतीनं प्रमोशन होते त्याप्रमाणे बॉलीवूडपटांचे होत नाही. अशी (Entertinment News) टीकाही सध्या होत आहे. त्यामुळे बॉलीवूडच्या दिग्गजांनी आता त्यावर विचार करण्यास सुरुवात केली आहे. हिंदी मनोरंजन विश्वातील ज्या (Tollywood Movies) लोकप्रिय मालिका आहेत त्यातील कित्येक मालिकांमध्ये साऊथच्या चित्रपटांचे प्रमोशन होताना दिसत आहे. त्यात पुष्पा, आरआरआर, केजीएफ आणि आता विक्रमचे नाव घेता येईल. यापूर्वी असे चित्र कधी दिसले नव्हते. एवढेच नव्हे तर बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते देखील टॉलीवूडपटांच्या प्रमोशनसाठी एकत्र येताना दिसत आहे. त्यामध्ये अभिनेता सलमान खान, आमीर खान यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

हेही वाचा: Vikram Movie: फक्त एक रुपया मानधन? अभिनेता सुर्यानं सांगितलं कारण...

सध्याच्या बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद रंगला असताना त्यावर अभिनेता कमल हासन यांनी एका मुलाखतीतून आमच्या चित्रपटांना प्रसिद्धी का मिळते, प्रेक्षकांना टॉलीवूडचा सिनेमा एवढा का आवडू लागला आहे या प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. कमल हासन यांचा विक्रम बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करताना दिसतो आहे. त्याच्या जोडीला अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र त्याला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळालेला नाही. विक्रमच्या समोर सम्राट पृथ्वीराजला प्रभाव पाडता आलेला नाही.

एका मुलाखतीमध्ये कमल हासन यांनी सांगितले की, प्रेक्षकांनी पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्यावी म्हणजे त्यांनी दक्षिण भारतीय सिनेमा आणि हिंदी चित्रपट यांच्यातील वादात पडू नये. सोशल मीडियावर कमल हासन यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्यांनी टॉलीवूडच्या चित्रपटाविषयी भाष्य केले आहे. चित्रपट ही एक वेगळी भाषा आहे. त्यामुळे आपल्या हिंदी की तमिळ असा वाद करण्याची गरज नाही. आता तुम्ही जो चित्रपट तयार करता त्याची भाषा जर प्रेक्षकांना आवडली तर तो चित्रपटही आवडू लागते. आपण नेमकी ही गोष्ट विसरतो. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यातील सिनेमा लँग्वेज ही प्रेक्षकांना भावली. म्हणून ते चित्रपट चालले. असे मत कमल हासन यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा: Vikram : कमल हासननं केलं रजनीकांत यांचं रेकॉर्ड ब्रेक! पहिल्याच दिवशी मोठी कमाई

Web Title: Tollywood Vs Bollywood Vikram Kamal Haasan Elaborate Cinematic Language Briefly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmenttollywood
go to top