Hrithik Roshan Burger King: बर्गर किंगचं 'जुगाड' ह्रतिकला नाही पटलं!

बॉलीवूडचा क्रिश ह्रतिक हा त्याच्या अभिनयासाठी, डान्ससाठी प्रसिद्ध असा अभिनेता आहे.
Hrithik Roshan
Hrithik Roshan esakal
Updated on

Hrithik Roshan Burger King New Ad: बॉलीवूडचा क्रिश ह्रतिक हा त्याच्या अभिनयासाठी, डान्ससाठी प्रसिद्ध असा अभिनेता आहे. बॉलीवूडमध्ये त्याचा (bollywood actor) चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून ह्रतिक हा वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेला अभिनेता आहे. त्याचा विक्रम वेधा नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं ह्रतिकनं त्याविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. आता ह्रतिक एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. मुंबईतील फिल्म सिटीमध्ये एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान वेगळा प्रसंग घडला आहे.

ह्रतिक जेव्हा त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आला तेव्हा उपस्थित (Entertainment News) फोटोग्राफर्सनं त्याची छबी टिपण्यासाठी गर्दी केली होती. ह्रतिक हा फोटोसाठी पोझ देत होता तेव्हा बर्गर किंगवाले स्वताचे प्रमोशन त्याच्या फोटोच्या माध्यमातून करुन घेत असल्याचे दिसून आले आहे. ही गोष्ट मात्र (Bollywood News) ह्रतिकला आवडलेली नाही. त्यानं सोशल मीडियावरुन याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ह्रतिक हा त्याच्या नव्या गर्लफ्रेंडवरुन चर्चेत आला होता. आता तो एका नव्या प्रसंगामुळे चर्चेत आला आहे. बर्गर किंगनं एक जाहिरात व्हायरल केली होती. त्यामध्ये ह्रतिक दिसतो आहे. अभिनेते जाहिरातीचं शुटींग करतच असतात. मात्र अशा पद्धतीनं केलेलं शुटींग नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

Hrithik Roshan
Video : संजनाने केला असा वटपौर्णिमेचा सण साजरा

व्ह्रॅनिटी व्हॅनमधून आल्यानंतर ह्रतिकचे फोटो घेण्यासाठी पापाराझ्झींची गर्दी झाली होती. त्याचवेळी बर्गर किंगच्या पोस्टर हातात घेऊन काही जण ह्रतिकच्या मागे उभे होते. ही गोष्ट ह्रतिकला माहिती नाही असे दाखवले गेले आहे. त्या बोर्डवर 50 रुपयांमध्ये बर्गरची जाहिरात आहे. अशा प्रकारे त्याची जाहिरात करण्यात आली आहे. ह्रतिकनं सोशल मीडियावर तुम्ही जे काही केलं ते बरोबर नव्हतं. असं म्हणून एक पोस्ट शेयर केली आहे. ह्रतिकची ती जाहिरात प्रेक्षकांना कमालीची भावली आहे. त्याला आतापर्यत साडेचार लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

Hrithik Roshan
Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com