esakal | क्रिशचा पॅराऑलिंपियन्सला सॅल्युट, पोस्ट व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

actor hritik roshan

क्रिशचा पॅराऑलिंपियन्सला सॅल्युट, पोस्ट व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा, ज्याच्या डान्सवर चाहते नेहमीच फिदा असतात अशा क्रिशला आतापर्यत प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं आहे. गेल्या काही वर्षांपासून तो वेगवेगळ्या सामाजिक कामांमध्येही व्यस्त झाला आहे. त्यानं त्यात सहभाग घेऊन समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ऋतिक रोशनचे आगामी काळात काही मोठे प्रोजेक्ट सुरु होणार आहे. त्याच्या चित्रिकरणात तो व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच जपानमधील टोकियोत पॅरालिम्पिकमध्ये भारतानं केलेल्या सुवर्ण कामगिरीवर त्यानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यानं चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी ऋतिकनं सुपर ३० मध्ये आनंद कुमार यांची भूमिका साकारली होती. त्यानं शिक्षक दिनाच्या औचित्यानं पॅराऑलिंपिक खेळाडू आणि शिक्षकांना समर्पित पोस्ट शेयर केली आहे.

ऋतिकनं आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे की, आपलं आयुष्य हा आपल्याला दरवेळी खूप काही शिकवत असतं. आपण त्याकडे आणखी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. जीवनाला सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणता येईल. त्यासाठी जीवनातले वेगवेगळे अनुभव आपण घेण्याची गरज आहे. मी #Paralympics 2021 मधील भारतीय स्पर्धकांना देखील एक मोठा 'शॉउट ऑउट' देऊ इच्छितो. याबाबत ऋतिक याविषयीच लिहितो, "तुमच्या या भागीदारीची प्रत्येक कहाणी, मैदानावरील प्रत्येक खेळाडू आणि मंचावरील विजेत्याला, स्वप्न बघणे, त्यावर विश्वास ठेवणे आणि ते प्राप्त करणे शिकवतात, या अजेय भावनेला सलाम। तुम्ही सगळेच जीवनासाठी उत्तम उदाहरण आहात.

त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं, तो सिद्धार्थ आनंदच्या 'फाइटर'मध्ये पहिल्यांदाच ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांना एकत्र पाहण्यास चाहते प्रचंड उत्सुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते ऋतिकच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. चर्चा अशी होती की, तो एका वेबमालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. मात्र त्याविषयी त्याच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्याच्या मागील चित्रपटात तो स्टार अभिनेता टायगर श्रॉफ सोबत दिसला होता.

हेही वाचा: आमीरनं भावाच्या तोंडावर सांगितलं की...

loading image
go to top