esakal | 'त्याच्याकडून एक इच्छा शेवटपर्यत अपूर्णच राहिली...'

बोलून बातमी शोधा

Irfan khan
'त्याच्याकडून एक इच्छा शेवटपर्यत अपूर्णच राहिली...'
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता इरफान खान याच्या निधनाला उद्या एक वर्ष पूर्ण होईल. त्यानिमित्तानं त्याच्या पत्नीनं सुतापानं इरफानच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. सुतापाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. त्या पोस्टला इरफानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. 29 एप्रिल 2020 साली इरफानचं निधन झालं होतं. त्याच्या जाण्यानं बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. यावेळी त्याच्या पत्नीनं काही किस्से आणि आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

इरफानच्या ज्या काही अपूर्ण इच्छा होत्या त्याविषयी सुतापानं सांगितलं आहे. सुतापानं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सांगितलं की, अजूनही त्याचं जाणं हे माझ्यासाठी खूपच वेदनादायी आहे. त्याच्या जाण्यानं झालेली पोकळी न भरुन येणारी आहे. सध्या सुतापा यांना काही रायटिंगशी संबंधित ऑफरही आल्या आहेत. मात्र त्यांना काम करता येणं शक्य नाहीये. काम करण्यासाठी मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देताना सुतापानं सांगितले आहे की, मी सध्या बाबिलसाठी चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे.

बाबिलला देखील अॅक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे. आणि त्याची आता एक फिल्मही येत आहे. त्यामुळे मी जास्त उत्सुक आहे. त्या चित्रपटामध्ये एका कोचची गोष्ट सांगण्यात आली आहे. ज्यात तो काही मुलांना फुटबॉलचे ट्रेनिंग देत असतो. आणि ती मुले टूर्नामेंट जिंकतात. अशी ती गोष्ट आहे. बाबिलच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन इरफानला करायचे होते. त्याला ती स्क्रिप्ट फार आवडली होती. मला जर अभिनय करायला मिळाला नाही तर मी दिग्दर्शन तर नक्कीच करेल. अशी इच्छा इरफाननं व्यक्त केली होती.