esakal | जॉनच्या सत्यमेव जयते 2 ची रिलिज डेट पुन्हा चेंज
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor john abraham f

जॉनच्या सत्यमेव जयते 2 ची 'रिलिज डेट चेंज'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील दोन प्रसिध्द अभिनेते जॉन अब्राहम आणि सलमान खान यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे अनेकांचे या दोन्ही अभिनेत्यांच्या चित्रपटाकडे लक्ष लागले होते. आता मात्र जॉनच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली आहे. सत्यमेव जयते 2 मध्ये जॉन अब्राहम भूमिका करणार होता. तर सलमानच्या राधे द मोस्ट वाँटेड भाई या चित्रपटाचे सर्वांना वेध लागले आहेत.

या दोन्ही चित्रपटांमुळे जॉन आणि सलमान हे एकमेकांसमोर येणार होते. त्यांच्यात कोण विजयी होणार, कुणाचा चित्रपट सर्वाधिक चालणार याविषयी सर्वांना उत्सुकता होती. आता मात्र त्यावर पाणी फेरले गेले आहे. सत्यमेव जयते च्या दुस-या भागामध्ये जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला यांच्या मुख्य भूमिका आहेत. सत्यमेव जयतेच्या दुस-या भागाचे निर्मात्यांनी तारीख बदलल्याचे सोशल मीडियावर सांगितले आहे. कोरोना संक्रमणाचा वाढता रोख लक्षात घेता या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे कळते आहे.

13 मे रोजी टी सीरिज यांच्यावतीनं सत्यमेव जयतेचा दुसरा भाग प्रदर्शित होणार होता. बॉक्स ऑफिसवर सलमान आणि जॉन अब्राहम हे एकमेकांसमोर येणार आहे. त्यामुळे कुणाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार याविषयी चर्चा सुरु आहे. राधे द मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे त्या दोन्ही चित्रपटांमध्ये कुणाची सरशी होणार याविषयी दोघांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु होती. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सरकारनं एपिलच्या मध्यापासून लॉकडाऊनची घोषणा केली होती.

loading image