Video : जॉनवर आली तिकिटं विकायची वेळ; काय आहे कारण?

john abraham
john abraham

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे जॅान इब्राहिम. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. सत्यमेव जयते, परमाणू, बाटला हाऊस या चित्रपटातून जॅानने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कोरोनामुळे जॉनचे अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नव्हते. अटॅक, सत्यमेव जयते 2, मुंबई सागा या जॉनच्या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हे चित्रपट 2021मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच जॉनचा 'मुंबई सागा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जॉनसोबत इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. इमरान नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जॉन आणि इमरान चित्रपटगृहामध्ये गेले असे दिसत आहे. यावेळी जॉनने चित्रपटगृहातील तिकीट काउंटरवर प्रेक्षकांना मुंबई सागा चित्रपटाची तिकीटे दिली. जॉनला तिकीट काउंटरवर पाहून तेथील प्रेक्षकांना आश्चर्य वाटले. 

जॉनने चित्रपटगृहात प्रेक्षकांना दिलेले हे सरप्राईज पाहून या व्हिडीओला कमेंट करून अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. इमरानने या व्हिडीओला कॅप्शन दिले की, 'अमर्त्य आणि विजय मोठ्या स्क्रीनवर तुमच्या भेटीस येणार आहे. या वर्षीची सर्वात मोठी लढाई पाहण्यासाठी  आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा आणि चित्रपटाचा आनंद घ्या.'

मुंबई सागा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शुक्रवारी 2.38 कोटींची कमाई केली आहे.  सुट्टीचा दिवस नसतानाही एवढी कमाई केल्याने हा चित्रपट विशेष ठरला आहे. बऱ्याच चित्रपटगृहात हा चित्रपट हाऊसफूल झाला. काही ठिकाणी 50 टक्के आसनक्षमता असूनही य़ा चित्रपटाने जोरदार कमाई केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटात 80 च्या दशकातील गँगवार दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्णन कुमार, संगिता आहिर आणि अनुराधा गुप्ता यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com