Mithilesh Chaturvedi Passes away
Mithilesh Chaturvedi Passes awayesakal

Mithilesh Chaturvedi Death: बॉलीवुड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदींचे निधन

मिथिलेश चतुर्वेदी यांचं ३ ऑगस्टच्या संध्याकाळी निधन झाल्याचं कळतंय. त्यांचे जावई आशीष चतुर्वेदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
Published on

बॉलीवुड इंडस्ट्रीतून दुखद बातमी पुढे येतेय. प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांचे दिर्घकाळ आजाराने निधन झाले आहे. मिथिलेश चतुर्वेदी यांचं ३ ऑगस्टच्या संध्याकाळी निधन झाल्याचं कळतंय. त्यांचे जावई आशीष चतुर्वेदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. मिथिलेश यांनी अनेक मोठ्या बॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'कोई मिल गया' या चित्रपटातील त्यांची कामगिरी बहुचर्चित होती. त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. (Bollywood Actor Mithilesh Chaturvedi Passes away)

अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. रिपोर्टनुसार त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी त्यांच्या गावी लखनऊ मध्ये हलवण्यात आलं. 'मिथिलेश एक उत्कृष्ट वडील असण्याबरोबरच उत्कृष्ट सासरे देखील होते.' या शब्दांत चतुर्वेदींच्या जावयांनी त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

या चित्रपटांत केले होते काम

मिथिलेश यांनी त्यांच्या करियरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांत काम केले आहे. 'गदर: एक प्रेम कथा', सत्या, अशोका, ताल, बंटी और बबली, रेडी अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. मात्र 'कोई मिल गया' या चित्रपटातील त्यांच काम चांगलंच चर्चेत होतं. या चित्रपटात हृतिकच्या टीचरची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. मिथिलेश चतुर्वेदी यांनी थिएटरमध्येही काम केले आहे. काही काळापूर्वी त्यांना 'टल्ली जोडी' या वेब सिरीजमध्येही काम मिळालं होतं. थिएटर मध्येही त्यांच्या कामाची खुप प्रेशंसा केली जाते. मात्र आता हा अभिनेता आपल्यात नसल्याने इंडस्ट्रीमध्ये दु:ख व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com