घरात टिव्ही नाही म्हणून मुलीने दिला होता नकार.. आज 'तो' बॉलिवूड गाजवतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawazuddin siddiqui reveals a girl once rejected him

घरात टिव्ही नाही म्हणून मुलीने दिला होता नकार.. आज 'तो' बॉलिवूड गाजवतोय

Nawazuddin Siddiqui birthday : अत्यंत प्रतिकूल प्रतिस्थितीतुन संघर्ष करत आज यशाचं शिखर गाठणाऱ्या अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui)चा आज वाढदिवस. नवाझने आपल्या अभिनयाने अक्षरशः चाहत्यांना भुरळ घातली आहे. आज जरी त्याने हे यश मिळवलं असलं तरी एकेकाळी त्याच्या घरात टीव्ही नाही म्हणून त्याला मुलीकडून नकार मिळाला होता. त्याच दिवशी नवाझने टीव्हीमध्ये काम करण्याचा पण केला होता आणि तो त्याने पूर्णही केला. नेमकं काय घडल होतं ते सांगणारा हा किस्सा...

एका मुलाखतीत नवाझने हे सांगतिले होते. तो म्हणाला, 'उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा गावात मी राहात होतो. त्यावेळी आमच्याकडे टीव्ही नव्हता. पण गावात ज्यांच्याकडे टीव्ही होता त्यांच्याकडे 'ती' कृषी दर्शन पाहायला जायची. तेव्हा जाताना, माझ्याशी बोल असं मी तिला सांगायचो. पण ती कधीच माझ्याशी बोलली नाही. तेव्हा तिला माझ्यापेक्षा टीव्ही जास्त महत्वाचा वाटला असावा. त्याचवेळी ‘एक दिन तुझे मै टीव्ही पे आ कर दिखाऊंगा’ असा पण केला.' (nawazuddin siddiqui reveals a girl once rejected him)

'मुंबईमध्ये आल्यावर मी पहिल्यांदा एक मालिका केली. तेव्हा मला आठवलं की मी एका मुलीला वचन दिलं होतं. म्हणून मी माझ्या गावातील मित्राला फोन केला आणि त्या मुलीशी बोलायला सांगितलं. एक दिवस मी टीव्हीवर येईन असं तिला सांगितलं होतं. उद्या माझा कार्यक्रम आहे टीव्हीवर, हे तिला कळव असा निरोप दिला. त्यावेळी मित्र म्हणाला, अरे तिचं लग्न झालंय आणि तिला पाच सहा मुलं आहेत. ज्या व्यक्तीशी तिचं लग्न झालंय तो तिला टीव्ही तर पाहू देत नाहीच शिवाय घराबाहेरही पडू देत नाही,' अशी आठवण नवाझने सांगितली.