esakal | 'ती नेहमीच माझ्या ह्रदयात राहिल', प्रतिकचा टॅटू पाहिला का?

बोलून बातमी शोधा

pratik babbbar

'ती नेहमीच माझ्या ह्रदयात राहिल', प्रतिकचा टॅटू पाहिला का?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री स्मिता पाटील हिनं आपल्या अभिनयानं सर्वांना वेड लावले होते. आजही तिच्या अनेक चित्रपटांची आठवण प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. तिचं अकाली जाणं हे सर्वांना चटका लावून जाणारं होतं. त्यामुळे आजही प्रेक्षकांना स्मिता पाटीलचे चित्रपट एक सुखावून जाणार अनुभव असतो. आजची पिढी तिचे चित्रपट आवर्जुन पाहत असते. प्रतिक बब्बर हा तिचा मुलगा. अद्याप त्याच्या वाट्य़ाला बॉलीवूडमध्ये म्हणावे असे यश आलेले नाही. तो त्या यशाच्या शोधात आहे. त्यासाठी मेहनतही करत आहे. त्यानं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम करुन आपली ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र त्याला एखादा ब्लॉकबस्टर मिळालेला नाहीये.

सोशल मीडियावर प्रतिक बब्बर हा नेहमी चर्चेत असतो. त्याच्या नावाचा चांगला बोलबालाही असतो. आताही तो चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं त्याच्या आईच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे. त्यानं त्या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला फॅन्सचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांना त्यानिमित्तानं स्मिता पाटील यांची आठवण झाली आहे. त्यांनी प्रतिकला धन्यवाद दिले आहेत. त्याचे कौतूकही केले आहे. प्रतिकनं जो फोटो शेअर केला आहे त्यात तो टॅटू दिसून येईल. त्यानं छातीवर स्मिता पाटील यांचे नाव लिहिले आहे. त्या नावाखाली तिची 1955 ही जन्मतारीख दिली आहे.

हा फोटो शेअर करताना प्रतिकनं लिहिलं आहे की, माझ्या ह्रदयावर मी माझ्या आईचं नाव लिहिलं आहे. ती नेहमीच माझ्या ह्रदयात राहील यात शंका नाही. सोशल मीडियावर प्रतिकचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानं त्या टॅटूमध्ये स्मिता पाटील यांच्या निधनाची तारीख दिलेली नाही. स्मिता पाटीलचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या आदरानं घेतले जाते. तिनं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 1975 मध्ये चरणदास चोर चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती.