'तिच्या प्रेमात पडलो हीच मोठी चूक' |Bollywood Actor Prateik Babbar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

prathik babbar

'तिच्या प्रेमात पडलो हीच मोठी चूक'

Bollywood News: बॉलीवूडमध्ये असे काही स्टार किड आहेत ज्यांना त्यांच्या आई (bollywood actor) वडिलांसारखी लोकप्रियता मिळालेली नाही. त्यामध्ये दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर यांचे नाव घेता येईल. स्मिता (Smita Patil) पाटील यांनी आपल्या अभिनयानं मोठी उंची गाठली होती. अद्यापही त्यांची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे त्यांच्या मुलाला प्रतिकला अजूनही बॉलीवूडमध्ये स्वताची ओळख तयार करण्याकरिता संघर्ष करावा लागत आहे. आता तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे त्यांचे झालेले ब्रेक अप. एका मुलाखतीमध्ये त्यानं आपल्या नात्याविषय़ीच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

प्रतिक बब्बरला कमी वयातच मोठे मानसिक धक्के बसल्यानं तो काही काळ व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तो अद्यापही संघर्ष करताना दिसतो आहे. लहानपणी त्याला मातृशोकाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर त्यानं जेव्हा करिअरला सुरुवात केली तेव्हा त्यातून समोर आलेलं अपयश याचाही परिणाम त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर झाल्याचे दिसून आले आहे. आता प्रतिकच्या ब्रेक अपची बातमी समोर आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेक अपच्या प्रसंगाविषयी प्रतिकनं सांगितलं आहे. एमी आणि प्रतिक हे एक दिवाना था या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले होते. त्यानंतर त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. 2012 नंतर त्यांच्या रिलेशनशिपनं चाहत्यांमध्ये चर्चा होती.

एका मुलाखतीमध्ये प्रतिकनं सांगितलं की, माझ्यासाठी तो काळ मोठा वेदनादायी होता. त्यावेळी मी नैराश्यातच गेलो होतो. माझा एक दिवाना था तेव्हा चांगला चालला होता. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला होता. त्यावेळी मी एमीच्या प्रेमात पडलो. मात्र मी तिच्या प्रेमात पडणं हीच माझी चूक होती. त्यानंतर काय होणार याची कल्पना काही मला नव्हती. या साऱ्याची किंमत मला चुकवावी लागली. असेही प्रतिकनं सांगितलं होतं. 2019 च्या ब्रेक अपनंतर प्रतिकनं सान्या सागरशी लग्न केलं होतं.

Web Title: Bollywood Actor Prateik Babbar Reacted Girlfriend Amy Jackson Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top