'भारतात चित्रपट बनवणं अवघड काम'; 'भवई’ वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'भारतात चित्रपट बनवणं अवघड काम'; 'भवई’ वरुन पेटला वाद

'भारतात चित्रपट बनवणं अवघड काम'; 'भवई’ वरुन पेटला वाद

मुंबई - स्कॅम 1992 मधून प्रचंड लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणून प्रतिक गांधी प्रेक्षकांसमोर आला. त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्कॅम या वेबसीरिजमध्ये त्यानं हर्षद मेहताची भूमिका साकारली होती. त्या भूमिकेला पूरेपूर न्याय देत मोठी लोकप्रियता मिळवली. त्या मालिकेतील त्याच्या तोंडचे संवादही कमालीचे हिट झाले होते. प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता यांनी स्कॅम 1992 चं दिग्दर्शन केलं होतं. ओटीटीवर सर्वाधिक चर्चिली आणि पाहिली जाणारी मालिका म्हणून स्कॅम 1992 चे नाव घेता येईल. गुजराती थिएटर आणि सिनेमापासून सुरुवात करणारा प्रतिक गांधी आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानं त्याविषयी प्रतिक्रियाही दिली आहे. पहिल्यांदाच त्याला अशाप्रकारे वादाला सामोरं जावं लागत आहे.

आता प्रतिक गांधी पहिल्यांदाच हिंदी चित्रपट भवई मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यात लीड रोलमध्ये आहे. सुरुवातीला हा चित्रपट रावणलीला या नावानं तयार होणार होता. मात्र त्या चित्रपटाच्या नावावरुन मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसुन आले आहे. त्या वादाचा फटका प्रतिक गांधीला बसला आहे. अशाप्रकारच्या वादाची सवय नसलेल्या प्रतिकनं त्यावरुन प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात त्यानं लोकं कधी कुठल्या प्रकारच्या गोष्टीवरुन वाद निर्माण करतील हे काही सांगता येत नाही. तेव्हा काळजी घ्यावी लागते. अशी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. भवईचा ट्रेलर जेव्हा सोशल मीडियावर रिलिज झाला तेव्हा त्यावरुन प्रतिकला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाचे नावचं बदलण्याचा निर्णय घेतला.

यासगळ्या प्रकरणावर प्रतिकनं सांगितलं की, जेव्हा निर्मात्यांनी त्या चित्रपटाचे नाव बदलले त्यातून त्यांना हेच सांगायचे आहे की, चित्रपटात वादग्रस्त असे काही नाही. लोकांनी त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यात तथ्य नाही. त्या चित्रपटामध्ये राम आणि रावण यांचे काहीही देणेघेणे नाही. हे लोकांनी लक्षात घ्यावे. ज्यावेळी ट्रेलर बनवला जातो तेव्हा तो प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी तयार केला जातो. त्यात प्रेक्षकांच्या भावना दुखावण्याचा हेतू नसतो. हे सुजाण प्रेक्षकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. ज्यांनी भवईला ट्रोल केले आहे त्या व्यक्तींचे सोशल मीडियावरील अकाउंट बनावट असल्याचे दिसून आल्याचेही प्रतिकनं यावेळी सांगितले.

हेही वाचा: प्रख्यात शास्त्रीय गायकाला जीवे मारण्याची धमकी, दोघांना अटक

हेही वाचा: आर्यन खानचा मुक्काम तुरुंगातच; कोर्टानं निर्णय ठेवला राखून

Web Title: Bollywood Actor Pratik Gandhi Bhavai Contraversy Trolled Trailer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..