'हे' कारण आहे राजकुमारचं हनीमुनला न जाण्याचं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हे' कारण आहे राजकुमारचं हनीमुनला न जाण्याचं...
'हे' कारण आहे राजकुमारचं हनीमुनला न जाण्याचं...

'हे' कारण आहे राजकुमारचं हनीमुनला न जाण्याचं...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - आपल्या वेगळ्या शैलीतील अभिनयामुळे प्रसिद्ध झालेल्या राजकुमार रावचं नुकतचं लग्न झालं. कोरोनाच्या नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या त्या विवाहसोहळ्याला दोन्ही परिवारातील निवडक पाहूणे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून राजकुमारच्या लग्नाची चर्चा रंगली होती. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळया प्रकारचे मीम्सही व्हायरल झाले होते. आता चर्चा त्याच्या हनीमुनची आहे. त्यावरुन तो आणि त्याची पत्नी पत्रलेखा यांना त्यांच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. मात्र राजकुमारनं आपल्याला इतक्यात हनीमुनला जाण्याचा कुठलाही विचार नसल्याचे सांगितले आहे.

15 नोव्हेंबरला मोठ्या धुमधडाक्यात राजकुमार रावचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर राजकुमार लगेच आपल्या प्रोजेक्टच्या कामासाठी रवाना झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोघेजण परदेशात हनीमुनसाठी जाणार होते. मात्र त्याचे काय आहे की, सध्या राजकुमार राव हा अनुभव सिन्हा यांच्या भीड नावाच्या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. त्यासाठी तो लखनऊला रवाना झाला आहे. यावरुन त्याला चाहत्यांनी प्रश्न विचारला आहे तो म्हणजे हनीमुन केव्हा.....

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

हेही वाचा: कंगना राणावत म्हणते, वीर दासवर कडक कारवाई करा

भुषण कुमारव्दारा निर्मित भीड नावाच्या चित्रपटामध्ये राजकुमार प्रमुख भूमिका साकारणार असून त्याच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. यापूर्वी राजकुमारनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, लग्नानंतर भीडची शुटींग सुरु होणार आहे. त्यानुसार तो लग्न झाल्यानंतर सेटवर दाखल झाला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे राजकुमारन पहिलं काम मग हनीमुन असा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top