Ranbir Kapoor: रणबीरला कोणता आजार जडला? नेटकऱ्यांचा गुगलवर शोध|Bollywood Actor Ranbir Kapoor Bramhastra movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bollywood actor ranbir kapoor

Ranbir Kapoor: रणबीरला कोणता आजार जडला? नेटकऱ्यांचा गुगलवर शोध

Bramhastra Movie: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या ब्रम्हास्त्र चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. याशिवाय समशेरा चित्रपटामुळेही त्याच्या नावाची (Bollywood Actor Ranbir Kapoor) चर्चा आहे. गेल्या आठवड्यात समशेराचा ट्रेलर व्हायरल झाला होता. त्याला रणबीरच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. आलिया आणि रणबीरच्या गुड न्युजनं तर सोशल मीडियावर कहर केला होता. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हाय़रल झाले होते. (social media viral news) काहींनी त्यांना शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांना नेहमीप्रमाणे ट्रोलही केले. रणबीर आणि आलिया हे त्यांच्या आगामी एका चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे होते.

आता रणबीर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याला (Alia bhatt) असणारा एक आजार. त्यावर कित्येक नेटकऱ्यांनी गुगलचा आधार घेत आपल्या आवडत्या अभिनेत्याला नेमक्या कोणत्या आजारानं ग्रासलं आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या गुगलवर रणबीर कपूरबाबत चार प्रश्न ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे. येत्या काही दिवसांत रणबीरचा ब्रम्हास्त्र आणि समशेरा नावाचे चित्रपट प्रदर्शित होणार असून नेटकऱ्यांना त्याविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

बॉलीवूडमध्ये आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या लग्नाची चर्चा ही नेहमीच चर्चेत असते. त्यात रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत घडले होते. आता त्यांच्या गुड न्युजबाबत चर्चा आहे. त्यानंतर रणबीरविषयीच्या त्या चार खास गोष्टी हा सध्या ट्रेडिंगचा विषय आहे. नेटवर रणबीरबाबत अनेक गोष्टी शेयर केल्या जात आहे. त्यामध्ये त्याला असणारा आजार कोणता, तो इंस्टाग्रामवर का नाही, त्याचे आणि करिना कपूरचे नाते काय आहे, असे प्रश्न विचारत आहे. यात सर्वाधिक सर्च रणबीरला कोणता आजार आहे यावर होत आहे.

हेही वाचा: Alia Bhatt : आलियाचा गुलाबी वन-पीसमधला लूक पाहून चाहते घायाळ

काही दिवसांपूर्वी रणबीरच्या पहिल्या पत्नीवरुन सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. रणबीरच्या घराच्या गेटवर एका चाहतीनं मंगलाष्टक म्हणून आपण रणबीर सोबत लग्न केल्याचं सांगितलं होतं. रणबीरच्या सुरक्षारक्षकानं त्याला ही माहिती दिली होती. रणबीरनं 14 एप्रिल 2022 रोजी आलियाशी लग्न केलं होतं. रणबीरला नेझल सेप्टम डेव्हिएशन नावाचा एक आजार आहे. त्यानं 2013 मध्ये आलेल्या ए जवानी है दिवानी चित्रपटाच्यावेळी या आजाराचा खुलासा केला होता.

हेही वाचा: RK/RKAY Trailer: मेहबूबा गेली कुठं?मल्लिकाची एंट्री, नेटकरी घायाळ

Web Title: Bollywood Actor Ranbir Kapoor Bramhastra Movie Nasal Septum Deviation Disease Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..